ओटीपीचा जमाना गेला; आता स्माईल प्लीज…!

सामना ऑनलाईन, नवी दिल्ली

ऑनलाइन पेमेंटसाठी आपल्याला पासवर्ड किंवा ओटीपीची गरज असते. पण आता ऑनलाइन पेमेंटसाठी तुमची एक स्माईलही पुरेशी आहे. अलीबाबा या ई-कॉमर्स कंपनीने ग्राहकांसाठी ही नवी सेवा सुरू केली आहे. ऑनलाइन शॉपिंग किंवा पैसे ट्रान्सफर करण्यासाठी ओटीपी म्हणजेच वनटाईम पासवर्डची गरज असते. आपल्या रजिस्टर मोबाईलवर हा पासवर्ड आल्यानंतर आपण ऑनलाइन पेमेंटची प्रक्रिया पूर्ण करतो. पण अलीबाबाचे ग्राहक आपल्या एका स्माईलने ऑनलाइन पेमेंट करू शकणार आहेत. या सेवेला अलीपे ऑनलाइन पेमेंट आणि अलीपे वॉलेट ऍपला जोडण्यात आले आहे. यात ग्राहकाचा चेहरा पाहूनच पेमेंटची प्रक्रिया पूर्ण केली जाते. त्यासाठी एक सेल्फ सर्व्हिस कॅमेरा दिला जाणार असून या कॅमेराकडे पाहून ग्राहकाने फक्त एक स्माईल द्यायची आहे.