डेव्हीड वॉर्नर-डी कॉकच्या धक्काबुक्कीचा नवा व्हिडीओ

सामना ऑनलाईन, दरबन
ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात झालेल्या कसोटी सामन्यानंतर ऑस्ट्रेलियाचा उपकर्णधार डेव्हीड वॉर्नर आणि दक्षिण अफ्रिकेचा क्रिकेटपटू क्विंटन डी कॉक यांच्यात ड्रेसिंगरूम बाहेर कडाक्याचं भांडण झालं होतं. हे प्रकरण मारामारीपर्यंत जाण्याची शक्यता होती. या भांडणाचा नवा व्हिडीओ प्रसारीत करण्यात आला असून ड्रेसिंगरूमकडे चालत येत असतानाच या भांडणाला सुरुवात झाली होती आणि वॉर्नर डी-कॉकमध्ये तिथे धक्काबुक्कीही झाली होती हे या व्हिडीओमध्ये बघायला मिळतंय.


या दोघांमध्ये वाद नेमका कोणत्या कारणामुळे झाला हे कळू शकलेलं नाहीये. मात्र वादाची सुरुवात वॉर्नरनेच केल्याचं उघड झालं आहे. त्याला याबद्दल ३ डिमेरीट अंक आणि सामन्यासाठी मिळणाऱ्या रकमेतून ७५ टक्के रक्कम दंड म्हणून कापण्याचे आदेश देण्यात आले आहेत.