‘तमन्ना’मध्ये दिसणार जिद्दी तरुणीची कहाणी

256

सामना ऑनलाईन । मुंबई

मोदक मोशन पिक्चर्स प्रस्तुत आणि दीपिका श्रीवास्तव निर्मित आणि लकी शेख दिग्दर्शित ‘तमन्ना’ ही वेबसिरीज अलीकडे पुणे येथे चित्रीत करण्यात आली असून ऑक्टोबर २०१८ च्या अखेरीस ती प्रदर्शित करण्यात येईल. एका जिद्दी मुलीबद्दल आणि तिच्या आयुष्याबद्दल ही सिरीज भाष्य करते. अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आपणाला ही सीरिज पाहूनच मिळतील. समाजात यशाची उंची गाठणाऱ्या अनेक स्त्रियांसाठी ही सीरिज प्रेरणादायी ठरेल, अशी आशा निर्मात्यांनी व्यक्त केली आहे.

या सिरीजमध्ये अभिमन्यु काक आणि अनन्या डे हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. अभिमन्यू हा रेडिओवरती आरजे म्हणून या आदी त्याने काम केले आहे. तो वयाच्या १६ व्या वर्षी सर्वांत लहान वयात आरजे झाला होता. अनन्या डे ही एक बंगाली अभिनेत्री आहे. तमन्नाचे क्रिएटिव्ह हेड अजित घोरपडे, मार्केटिंग आकर्षण कटीयार हे पाहत आहेत.

मोदक मोशन यांच्यावतीने ‘तमन्ना’ सिरीज मधून देवांशला लॉन्च केले जात आहे. मोदक मोशन पिक्चर्स या सिरीजमधून तो मनोरंजन क्षेत्रात पदार्पण करत असून आगामी काळात त्याचे सायलेन्स, सेल्फ कॉन्डेमेशन असे असून आगामी काळात मोदक मोशनकडून दर्जेदार कलाकृतींची निर्मिती केली जाणार आहे असे मोदक मोशन पिक्चर्सकडून आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत सांगण्यात आले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या