New Zealand क्रूर हल्ला… हल्लेखोरानं फेसबुकवरून केलं Live

nz-firing-10
अॅटोमॅटीक रायफलमधून अंदाधुंद गोळीबार करत मशिदीमध्ये अक्षरश: मृतदेहांचा खच पाडला.

सामना ऑनलाईन । ऑकलंड

न्यूझीलंडच्या ख्राईस्टचर्च भागामध्ये असलेल्या एका मशिदीमध्ये अंदाधुंद गोळीबार करण्यात आला. यात अनेकजणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 40 जणांचा मृत्यू झाल्याचे न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंदा आंद्रेन यांनी सांगितले आहे. गंभीरबाब म्हणजे हल्लेखोराने कौऱ्याची सीमा ओलांडात हल्ला करतेवेळी फेसबुक लाईव्हचा वापर केला. त्यामुळे सोशल मीडियावर एकच खळबळ उडाली.

ख्राईस्टचर्चच्या मशिदीत हल्ला करणाऱ्या बंदुकधारी हल्लेखोराने 17 फेसबुक लाईव्ह सुरू ठेवले होते. या हल्लेखाराचे नाव ब्रेंटन टॅरेंट असल्याचे समजते. ब्रेंटन टॅरेंट हा 28 वर्षाचा असून तो ऑस्ट्रेलियात वास्तव्याला आहे. या हल्लेखोराने डीन एवेन्यू भागात अल नूर मशिदीजवळ आपली कार पार्क केली. त्यानंतर मशिनगन घेऊन मशिदीत शिरला आणि मग अंधाधुंद गोळीबार केला. तो लष्काराच्या वेशात आला होता आणि मशिदीत जो दिसेल त्याला गोळ्या घालत होता. हे सर्व तो फेसबुकवरून लाईव्ह करत होता. या दरम्यान त्याने दोन मॅगझिन फायर केले होते. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि खळबळ उडाली. त्यानंतर हा व्हिडीओ हटवण्यात आला. तसेच अन्य सोशल माध्यमांतून हा व्हिडीओ व्हायरल करू नये अशी विनंती देखील प्रशासनाकडून करण्यात आली आहे.

दरम्यान, या हल्लेखोराने आणलेली गाडी ताब्यात घेण्यात आली आहे. गाडीमध्ये अनेक शस्त्रे होती ती जप्त करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.