मानपानाला फाटा देत नवदाम्पत्याचा स्तुत्य निर्णय, कालवा दुरुस्तीला दिले पैसे

3

सामना प्रतिनिधी । राहाता

विवाह सोहळ्यातील मान पान व सत्कार समारंभाला फाटा देत त्यातून बचत झालेले पाच हजार रूपये गोदावरी उजव्या कालव्याच्या नुतणीकरणासाठी लोकवर्गणी देऊन रामपुरवाडीच्या जाधव कुटुंबाने नवा पायंडा पाडला.

राहाता तालुक्यातील रामपुरवाडी येथील शेतकरी रामदास जाधव यांची कन्या निकीता व अस्तगांव येथील प्रभाकर गोर्डे यांचा मुलगा धनंजयचा शुभविवाह रामपुरवाडी येथे संपन्न झाला. यावेळी उपस्थित पाहुणेमंडळींचा सत्कार करण्याचे नियोजन सुरू असताना पुणतांब्याचे सरपंच डॉ. धनंजय धनवटे यांनी सत्काराचा खर्च टाळून त्याऐवजी सुरू होत असलेल्या गोदावरी उजव्या कालव्याच्या रूंदीकरणासाठी मदत करा असे आवाहन केले. याला उपस्थित शेतकऱ्यांनीही साथ दिली. त्यानंतर सत्कार समारंभाला फाटा देत त्यातील बचत झालेले पाच हजार रूपयाचा निधी मुलीचे आजोबा यांनी डॉ. धनवटे व रामपुरवाडीच्या महिला सरपंच सविता जगताप यांच्याकडे सुपुर्त करत एक नवीन पायंडा पाडला.