लग्न झालेलं जोडपं तीन दिवस टॉयलेटला जात नाही, वाचा काय आहे कारण….


सामना ऑनलाईन । जकर्ता

संपूर्ण जगभर लग्नाशी निगडीत अनेक परंपरा आहेत. काही परंपरा तर इतक्या विचित्र आहेत की त्यावर तुमचा विश्वासही बसणार नाही. इंडोनेशियातील टीडॉन्ग समुदायातही अशीच एक प्रथा आहे. त्यामध्ये लग्नानंतर नवरा-नरी तीन दिवस टॉयलेटचा वापर करु शकत नाही.

लग्न हा पवित्र संस्कार आहे. टॉयलेटमध्ये गेल्यानंतर त्यातील पावित्र्य संपुष्टात येते अशी या लोकांची समजूत आहे. नवरा-नवरींना कुणाचीही नजर लागू नये म्हणून ही प्रथा पाळली जाते. वॉशरुमचा वापर अनेक मंडळी करत असतात. ही सर्व मंडळी आपल्या शरिरातील घाण वॉशरुममध्ये सोडतात. त्यामुळे त्या ठिकाणी नकारात्मक शक्ती असते. लग्नानंतर लगेच टॉयलेटला गेल्यास नवरा-नवरीची मानसिकताही नकारात्मक होण्याची शक्यता आहे. त्याचा फटका नवदामप्त्याच्या वैवाहिक आयुष्यालाही बसू शकतो, अशी अजब समजूत या लोकांची आहे.

या विषयावर ही मंडळी इतकी संवेदनशील आहेत की ही प्रथा मोडल्यास एखाद्याचा जीवही जाऊ शकतो. त्यामुळे लग्नानंतर जोडप्याने ही प्रथा मोडू नये यासाठी ही मंडळी विशेष खबरदारी घेत असतात.