याला ओळखलं का?

सामना ऑनलाईन । मुंबई

हिंदी चित्रपटसृष्टीचा ‘अली’ हा बऱ्याच काळापासून चंदेरी दुनियेपासून दूर आहे. नुकताच इमरान हाश्मीच्या घराबाहेर पडताना अभिनेता उदय चोप्राला छायाचित्रकारांनी कॅमेऱ्यात कैद केले. एकेकाळी पिळदार शरीरयष्टी असलेला हा अभिनेता आता मात्र अगदीच वेगळा दिसू लागला आहे. त्याच्या चाहत्यांनी त्याच्या तब्येतीबाबत अनेक शंका उपस्थित केल्या आहेत. त्याचे हे फोटो पाहून प्रेक्षकांच्या व त्याच्या चाहत्यांच्या भुवया उंचावल्या आहेत.

मोहब्बते या चित्रपटातून हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण केल्यानंतर त्याने मुझसे दोस्ती करोगे, कल हो ना हो, धूम यासारखे चित्रपट त्याने केले. धूम ३ या चित्रपटातही अभिनेता आमीर खान व अभिषेक बच्चन यांच्यासोबत त्याने काम केले. काही दिवसांपूर्वी अभिनेत्री नरगिस फकरी व उदय चोप्रा यांच्या ब्रेकअपच्या चर्चांना उधाण आले होते.