‘इथे’ एका दादल्याला दोन बायका, अन्यथा तुरुंगाची हवा खा

सामना ऑनलाईन । इरीट्रिया

आपल्या नवऱ्याने दुसऱ्या मुलीसोबत जरा बोलले किंवा तिच्यासोबत एखादा फोटो जरी काढला तरी समस्त महिलावर्गाची तळपायाची आग मस्तकाला जाते. पण आफ्रिकेतील इरीट्रिया शहरात राहणाऱ्या महिला मात्र याबाबत काहीच करू शकत नाहीत. कारण तेथील प्रत्येक घराघरात एक पुरूष व दोन बायका अशी स्थिती पाहायला मिळते. याचे मुख्य कारण म्हणजे इरीट्रिया शहरात पुरूषांच्या तुलनेत महिलांची संख्या जास्त असल्याने या देशातील पुरुषांना दोन महिलांसोबत विवाह करावा लागतो. यासाठी तिथे विशेष कायदाही बनवण्यात आला असून जो पुरूष दुसरे लग्न करण्यास नकार देईल त्याला शिक्षा म्हणून जेलची हवा ही खायला लागू शकते.

काही वर्षांपूर्वी इरीट्रिया शहरातील दाम्पत्यांना मुलीच होते असत. मुलींच्या तुलनेत मुलांची संख्या कमी असल्याने तेथील सरकारने एका मुलाने दोन मुलींसोबत विवाह करण्याचा अजबच कायदा अमलात आणला. त्या काळात या कायद्याला विरोध करून दुसरे लग्न न करणाऱ्यांना जेलमध्ये डांबून ठेवण्यात आले होते.

आपल्या पतीला दुसरा विवाह करण्यापासून जर एखाद्याची पहिली पत्नी रोखत असले तर तिला देखील आजीवन कारावासाची शिक्षा होऊ शकते. असा आणखी एक अजब कायदा तेथील सरकारने महिलावर्गासाठी काढला आहे. त्यामुळे नेहमी प्रत्येक गोष्टीत नाक खुपसण्याची सवय असलेल्या महिलांना यावेळी मात्र शांत राहावे लागते. या कायद्याचे सकारात्मक परिणाम दिसू लागले असून गेल्या काही वर्षात इरीट्रिया शहरातील महिलांची लोकसंख्या कमी होत आहे.