मृत्यूनंतरही ‘या’ व्यक्ती कमावतात कोट्यवधी रुपये

सामना ऑनलाईन । मुंबई

‘फोर्ब्स’ या जगप्रसिद्ध मासिकाने जगामधील अशा काही व्यक्तींची यादी जाहीर केली आहे, ज्या व्यक्ती आपल्या मृत्यूनंतरही कोट्यवधी रूपये कमावत आहेत. यामध्ये काही मोठ्या सेलिब्रिटींची नावे आहेत. ज्यामध्ये पॉप स्टार मायकल जॅक्सनचे नाव आघाडीवर आहे. या यादीतील सर्वांना आश्चर्यचकीत करणारे नाव अर्ल्बट आइन्स्टाईन यांचे आहे. अर्ल्बट आइन्स्टाईन यांचा मृत्यू ६२ वर्षांपूर्वी झाला होता. याव्यतिरिक्त या यादीत बॉब मारले, जॉन लेनन, अर्नाल्ड पामर, चार्ल्स शुल्ज यांसारख्या काही कलाकारांचाही समावेश आहे.

मायकल जॅक्सन

‘किंग ऑफ पॉप’ या नावाने संपूर्ण जगभरात प्रसिद्ध असलेल्या मायकल जॅक्सन याचे नाव या यादीत सर्वांत आघाडीवर आहे. मृत्यूनंतरही प्रत्येक वर्षी मायकल ४८ कोटी रुपये कमावतो. मायकलचा मृत्यू २००९ साली अमली पदार्थांच्या अतिसेवनामुळे झाला होता. असे असले तरी आजही त्याच्या म्युझिक कंपनीमध्ये त्याची भागीदारी असून त्याच्या म्युझिकची रॉयल्टी वेगळी मिळते. मागील वर्षी मायकलची हि म्युझीक कंपनी ४५० कोटी रूपये इतकी वार्षिक कमाई करत होती पण यावर्षी कंपनीच्या कमाईमध्ये घट झाल्याचे दिसून येते. असे असले तरीही या यादीत मायकल आघाडीवर आहेत.

आश्चर्यचकीत करणारं नाव – अर्ल्बट आइंस्टाईन

या यादीत सगळ्यांना आश्चर्यचकीत करणारे नाव म्हणजे अर्ल्बट आइन्स्टाईन. ते अजूनही वर्षाला ६ कोटी रुपये कमावत असून त्यांचा मृत्यू ६२ वर्षांपूर्वी झाला होता. विज्ञान क्षेत्रातील अनेक सिद्धांतांचे परवाने (पेटंट) त्यांच्या नावे असून त्या पेटंटची रॉयल्टी त्यांना मिळते.

पाहूयात ‘फोर्ब्स’ची ही यादी-

१. मायकल जॅक्सन (सिंगर आणि डान्सर) ४८ कोटी रूपये मिळकत.
२. अर्नाल्ड पामर (गोल्फर) २५ कोटी रूपये मिळकत.
३. चार्ल्स शुल्ज (कार्टुनिस्ट) २४ कोटी रूपये मिळकत.
४. एल्विस प्रीस्ले (सिंगर आणि अॅक्टर) २२ कोटी रूपये मिळकत.
५. बॉब मारले (सिंगर) १५ कोटी रुपये मिळकत.
६. टॉम पेटी (सिंगर) १३ कोटी रुपये मिळकत.
७. प्रिंस (म्यूजिशियन आणि अॅक्टर) १२ कोटी रुपये मिळकत.
८. डॉ. स्यूज (ऑथर) १० कोटी रुपये मिळकत.
९. जॉन लेनन (म्यूजिशियन) ८ कोटी रुपये मिळकत.
१०. अल्बर्ट आइंस्टीन (शास्त्रज्ञ) ६ कोटी मिळकत.