आम्ही खवय्ये :रसपूर्ण खाणं!

264

संगीतकार नीलेश मोहरीर उपवासी पदार्थांसहीत सगळय़ाच शाकाहारी पदार्थांचा समरसून आस्वाद घेतो.

  • ‘खाणं’ या शब्दाची तुझ्या दृष्टीने व्याख्या काय? – आनंद घेण्यासाठी लोकं खातात, पण आता मी आनंद आणि पोषण यांचा समतोल राखून खाण्याकडे बघतो.
  • खायला काय आवडतं? – खासकरून शाकाहारी पदार्थांची आवड जास्त आहे. मांसाहारी पदार्थ पूर्वी खायचो. आता खूप कमी खातो. विशेष म्हणजे भाज्या आणि सलाड खायला खूप आवडतात. याबरोबरच इटालियन,  पंजाबी पदार्थही आवडतात.
  • खाण्याच्या आवडीतून फिटनेसची काळजी कशी घेतो? -सलाड खायला आवडतं. त्यामुळे बाहेर खाण्याची संधी मिळाली तर सूप आणि सलाड खाण्याला प्राधान्य देतो.
  • कोणत्या हॉटेलमध्ये जायला आवडतं? –जुहूतील जुहू रेसिडेन्सी आणि टेन वन आणि पार्ले पश्चिमेकडील राधाकृष्ण.
  • कार्यक्रमानिमित्त बाहेर असतोस तेव्हा खाणं-पिणं कसं सांभाळतो? – कार्यक्रमावेळी मला खूप काळजी घ्यावी लागते. कारण माझा आवाज पटकन खराब होऊ शकतो. त्यामुळे कोल्ड्रिंक, गार पाणी पित नाही. तेलकट पदार्थ टाळतो. सलाड, संडविच खातो.
  • स्ट्रीट फूड आवडतं का? – मुंबईत जन्मलेल्या माणसाला स्ट्रीट फूड आवडत नाही असं म्हणू शकत नाही. वडापाव, भेळ, पाणीपुरी, रगडा, सँडविचपासून सगळं आवडतं. एक दिवस धमाल करायची असेल तर पार्ल्याच्या खाऊगल्लीत नक्की जाऊन खातो.
  • घरातल्या स्वयंपाकात काय खायला आवडतं? -माझी आई आणि पत्नी दोघीही सुगरणी आहेत. त्यामुळे दोघींनी बनवलेलं सगळंच आवडतं.

कॉर्न ऍण्ड कॅश्यू राईस

छोटय़ा कुकरमध्ये तेल आणि थोडंसं तूप एकत्र करायचं. म्हणजे आधी तेल गरम करायचं त्यामध्ये वरून थोडंसं तूप सोडायचं. त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा, थोडीशी आलं-लसूण पेस्ट आणि आवडीनुसार इटालियन हर्ब्स घालायचे. यामध्ये गार्लिक किंवा मिरचीचे प्रकार वगैरे फोडणीत घालायचे. त्यानंतर त्यात कॉर्न आणि काजू टाकायचे आणि दोन माणसांसाठी साधारणं एक भांडं भात भिजवून ठेवायचा. तो या फोडणीत घालून एकजीव होईपर्यंत व्यवस्थित परतायचा. पाणी न घालता नीट परतायचा. नंतर थोडीशी साखर आणि चवीनुसार मीठ घालायचं. एक भांडं भाताला दोन भांडं पाणी घालायचं आणि कुकरला तीन शिट्टय़ा दिल्या की, कॉर्न ऍण्ड कॅश्यू राईस इज रेडी !

आपली प्रतिक्रिया द्या