माझा आवडता बाप्पा – नीलेश परब

गणपती बाप्पा खूप आवडतो. देव जरी एकच सर्वव्यापी असला तरी आपल्याला त्याचे विशिष्ट साकार रूपच आवडत असते. हे रूप साकारणारे नवे सदर.

तुझं आवडतं दैवत?

मी एकच शक्ती मानतो. ठराविक आवडतं दैवत नाही.

त्याचं कौतुक कशा पद्धतीने करायला आवडतं?

त्याचं कौतुक करण्यासाठी आपण फार लहान आहोत.

तुम्ही त्याच्याशी कसे बोलता?

मनातून त्याच्याशी बोलणं कायम सुरू असतं.

त्याच्यावर रागवता का?

पूर्वी व्हायचं असं, पण आता नाही.

आवडत्या दैवताला प्रार्थना केल्यावर यश मिळालंय, असा प्रसंग?

मी आज जे शिकलोय ते देवाचाच हात आहे. फक्त हे समजणं हे प्रत्येकावर अवलंबून आहे. थांबलेले पैसेही अचानक मिळतात. तुम्ही कितीही सोडा तो तुम्हाला सोडत नाही. याचा प्रत्यय आयुष्यात प्रत्येक वेळी आला आहे.      

कला आणि भक्ती याची सांगड कशी घालता?

याची काय सांगड घालायची. हे दोन्ही एकच आहेत. तुम्ही तुमचं काम भक्तीभावाने करा.

आवडत्या दैवताचं कोणतं स्वरूप आवडतं ?

गणपतीकडे मी आकर्षित होतो. घरी दत्तगुरूंची उपासना जास्त केली जाते. आता मला कुठलीही मूर्ती किंवा देवस्थान डोळे भरून बघायला जास्त आवडतं.

त्याची नियमित उपासना कशी करता ?

काही वर्षांपूर्वी मी रोज दोन तास पूजा करायचो. अथर्वशीर्ष, जप करायचो. पण आता तसं जमत नाही. पण मला जसं जमेल तसं मी त्याचं नाव घेत असतो, उपासना करतो असतो. त्याचाही कुठेही अट्टाहास नसतो. एक मिनीट फक्त मनापासून त्याचं नाव घेतलं तरी समाधान वाटतं. फक्त अपशब्द वापरू नका.