न्यूझीलंडमधील मशिदींवरील हल्ल्यानंतर नऊ हिंदुस्थानी बेपत्ता

सामना ऑनलाईन । ख्राईस्टचर्च

न्यूझीलंडच्या ख्राईस्टचर्च येथील मशिदीमध्ये झालेल्या अंदाधुंद गोळीबारानंतर नऊ हिंदुस्थानी वंशाचे नागरिक बेपत्ता असल्याचे समोर आले आहे. न्यूझीलंडमधील हिंदुस्थानचे उच्चायुक्त संजीव कोहली यांनी याबाबत माहिती दिली आहे. नऊ हिंदुस्थानींसह 17 जणं बेपत्ता असल्याचे समजते.

हिंदुस्थानी वंशाचे व हिंदुस्थानी असलेले 9 जण बेपत्ता आहेत. त्यांच्याबाबत अद्याप काहीही माहिती हाती आलेली नाही, असे ट्विट संजीव कोहली यांनी केले आहे. या हल्ल्यानंतर मूळचा हैदराबादचा असलेला फरहाज अहसान हा देखील बेपत्ता आहे. फरहाज हा देखील शुक्रवारची नमाज अदा करायला मशिदीत गेला होता.

या हल्ल्यात एक हिंदुस्थानी नागरिक देखील गंभीर जखमी झाला आहे. अहमद जहांगिर असे त्या व्यक्तीचे नाव आहे. अहमद हा मूळचा हैदराबादचा आहे. अहमदचा भाऊ खुर्शीद जहांगिर यांनी या बातमीला अधिकृत दुजोरा दिला आहे.