सुखोईतून प्रवास करणाऱया निर्मला सीतारामन पहिल्या महिला संरक्षणमंत्री

सामना ऑनलाईन । जोधपूर

संरक्षणमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज जोधपूर येथील विमानतळावरून सुखोई ३० या लढाऊ विमानातून उड्डाण केले. सुखोईतून प्रवास करणाऱया त्या पहिल्या महिला संरक्षणमंत्री ठरल्या आहेत. सुखोईतून उड्डाण करण्यापूर्वी त्यांनी वायुदलाच्या जवानांबरोबर चर्चाही केली. या आधी माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनी पुण्यातून सुखोईतून प्रवास केला होता. हवाई दलातील सुखोई हे सर्वोकृष्ट लढाऊ विमान मानले जाते.

सीतारमण यांनी काही दिवसांपूर्वीच गोव्यात युद्धनौका आयएनएस विक्रमादित्यची पाहणी केली होती. संरक्षणमंत्री झाल्यापासून सीतारमण सैन्य दलातील कार्यप्रणाली आणि तयारीबाबत माहिती घेत आहेत. तसेच जवानांना प्रोत्साहन देत आहेत.