ज्येष्ठांनाही कर्ज मिळू शकतं!


>>नितीन फणसे<<

आता आम्हाला कर्ज मिळणार नाही…’ ज्येष्ठांच्या तोंडी असलेलं हमखास वाक्य. पण वित्तसंस्थाही आता ज्येष्ठांची गरज ओळखून कर्ज देऊ करतात

पैशाची निकड कुणालाही भासू शकते. तरुणांना त्यांच्या प्रगतीसाठी जसा पैसा हवा असतो, तसंच आजी आजोबांनाही खर्च भागवण्यासाठी, तब्येत सांभाळण्यासाठी आणि नातवंडांसाठीही मोठय़ा रकमेची गरज भासते. पण ते कर्ज मागायला जातात तेव्हा वित्तसंस्थांच्या अटींमध्ये हे ज्येष्ठ नागरिक बसू शकत नाहीत. नोकरीतून निवृत्त झाला आहात, तुम्ही कर्ज कसं फेडणार? वयही वाढलेले असल्याने कर्ज देणाऱ्या संस्था थोडय़ा कचरतातच. पण… ज्येष्ठ नागरिकांची निकड बँकांनाही आता कळली आहे. पटली आहे. त्यामुळे विशिष्ट योजनांच्या अंतर्गत ते आजी आजोबांनाही कर्ज देऊ लागले आहेत. मात्र हे कर्ज घेताना ज्येष्ठांनी काळजी घेतली पाहिजे.

ज्येष्ठ नागरिकांना जी कर्जे दिली जातात त्यांना पेन्शन लोन म्हटलं जातं. हे पेन्शन लोन आजी आजोबा सहज घेऊ शकतात. त्यात एक मोठी रक्कम त्यांना मिळू शकते. मग येणाऱ्या महिन्याच्या पेन्शनमधून ते ही रक्कम थोडी थोडी करून फेडू शकतात. आजच्या महागाईच्या काळात ज्येष्ठांसाठी हा एक योग्य पर्याय आहे असं म्हणता येईल.

पेन्शन लोन

हे कर्ज घेताना वित्तसंस्था दोन अटी समोर ठेवतात. पहिली अट म्हणजे पेन्शनर्सचं वय ७५ वर्षांपेक्षा कमी असलं पाहिजे… यातही दोन पर्याय आहेत. कर्ज देणाऱ्या बँकेचाच कर्मचारी असेल तर असे पेन्शनर्स पाच लाखांपर्यंत कर्ज घेऊ शकतात. त्याच बँकेचे कर्मचारी नसाल, पण पेन्शन त्या बँकेत येत असेल तर असे पेन्शनर्स तीन लाखांपर्यंत हे लोन घेऊ शकतात. आणि दुसरं म्हणजे वय ७५च्या पुढे असेल तर एक लाखापर्यंत कर्ज कुणालाही घेता येईल. यात बँकर्स आणखी एक बाब विचारात घेतात. महिन्याला कर्जाचा हप्ता कापून गेल्यावर पूर्ण पेन्शन रकमेचा किमान ४० टक्के रक्कम उरायला हवी. हे कर्ज दोन प्रकारचे असते. सेक्योर लोन आणि क्लीन लोन… आजी आजोबा यातला कुठलाही पर्याय निवडू शकतात. या दोन्ही लोन प्रकारात कर्जाची रक्कम हातात आल्यानंतर एक महिन्याने पहिला हप्ता कापला जातो. या कर्जासाठी पात्रता एकढीच की पेन्शन रक्कम त्या बँकेत यायला हवी.

ही कागदपत्रे हकीत

* ओळख प्रमाणपत्र

* निवासाचे प्रमाणपत्र

* निवृत्त झाल्याचे प्रमाणपत्र

* अखेरचा पेन्शन पुरावा

* ३ पासपोर्ट साईज फोटो. या लोनसाठी काही बँका एकूण कर्ज रकमेच्या २ टक्के व्याज घेतात. काही बँका काहीच व्याज आकारत नाहीत.

तारण कर्ज

ज्येष्ठ नागरिकांसाठी ही सर्वात लोकप्रिय कर्ज योजना आहे. अनेक बँका रिवर्स मॉर्गेज कर्जाचे पीडिंग करत आहेत. रिवर्स मॉर्गेज कर्जही बँकांद्वारे सुरू करण्यात आलेली एक योजना आहे जिथे कर्जदार कर्ज घेऊ इच्छितात. कर्ज नियतकालिक हप्त्याद्वारे दिले जाते. नियतकालिक देयक हे अन्युइटी म्हणून ओळखले जाते. रिटर्न मॉर्गेजमुळे ज्येष्ठ नागरिकांना वृद्धापकाळाने त्यांच्या घरांमधून अतिरिक्त उत्पन्न मिळते. गहाण कर्जाची महत्त्काची आवश्यकता म्हणजे कर्जदाराने गहाण ठेवलेली मालमत्ता विरूद्ध कोणतेही थकबाकी कर्ज नसावे आणि त्याने ६० किंवा त्यापेक्षा जास्त असणे आवश्यक आहे.

अशीही कर्जे

अनेक बँका ज्येष्ठांसाठी वैयक्तिक कर्ज देऊ लागलेत. ही रक्कम आजी-आजोबा कोणत्याही हेतूसाठी वापरू शकतात. ही रक्कम १२ ते १८ वेळा मासिक पेन्शनची असू शकते जे कर्जदाराकडून मिळते किंवा बँकेने निश्चित केलेली एक निश्चित रक्कम, जे कमी असेल ते. ज्येष्ठ नागरिक गृहकर्जही घेऊ शकतात, पण ही रक्कम कर्जदाराच्या उत्पन्नाची आणि आर्थिक स्थितीवर आधारित मर्यादित केली जाऊ शकते. गृहकर्जासाठी ज्येष्ठांचे वय ७५ कर्षांपेक्षा जास्त नसावे. म्हणूनच तुम्ही ६० वर्षांच्या वयात कर्ज घेतले तर कालावधी १५ वर्षे असेल. हे सर्व निकष गृहकर्जांच्या रकमेकर परिणाम करतात.

हे लक्षात ठेका

* राज्य शासनाच्या किंवा केंद्र सरकारच्या सेवेतून निवृत्त झालेल्या आजी-आजोबांना कर्ज सहज मिळू शकते. बहुतेक बँकाही त्यांच्या माजी कर्मचाऱ्यांना वैयक्तिक कर्ज घेण्याची परवानगी देतात. कर्जदाराने कर्जाची परतफेड ७५ किंवा ७५ वर्षांपूर्वी करणे आवश्यक आहे.

* कर्जाचा हप्ता मासिक पेन्शनच्या ४० टक्क्यांपेक्षा जास्त नसावा. बँकाही हप्त्याच्या संख्येकर मर्यादा घालू शकतात.

* गॅरेंटर हा पती किंवा पत्नी किंवा इतर कोणतेही कुटुंब सदस्य असू शकतात.