साध्वी प्रज्ञासिंह यांना पक्षाबाहेर काढण्याचा भाजपने विचार करावा- नितीशकुमार

79
nitish-kumar

सामना ऑनलाईन । पाटणा

भोपाळमधील भाजपच्या उमेदवार साध्वी प्रज्ञासिंह यांनी नथुराम गोडसेबाबत केलेल्या वादग्रस्त विधानामुळे भाजप अडचणीत आली आहे. या वक्तव्यावरून विरोधीपक्ष भाजपवर टीका करत आहेत. आता भाजपचा मित्रपक्ष असलेल्या जदयूचे नेते आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनीही भाजपला सल्ला दिला आहे. साध्वी प्रज्ञासिंह यांनी दिलेल्या वादग्रस्त विधानामुळे त्यांना पक्षाबाहेर काढण्याबाबत भाजपने विचार करावा, असे नितीशकुमार म्हणाले आहेत. पाटणामध्ये मतदान केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे मत व्यक्त केले.

नथूराम गोडसे हा देशभक्त होता असे विधान साध्वी प्रज्ञासिंह यांनी केले होते. महात्मा गांधीबाबतची अशी वक्तव्ये दुर्दैवी आहेत. अशी वक्तव्ये करणाऱ्यांवर कारवाई करण्याची गरज आहे. अशी वक्तव्ये समाजही खपवून घेणार नाही. हा भाजपचा पक्षातंर्गत बाब असली तरी साध्वींना पक्षाबाहेर काढण्याबाबत विचार करण्यात यावा असे मत त्यांनी व्यक्त केले. तसेच लोकसभा निवडणुकीबाबतही त्यांनी आपले मत मांडले. निवडणुका इतक्या लांबवणे योग्य नाही. मतादानाचे टप्पे कमी करून कमी वेळेत मतदान संपवण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. मतदानाच्या दोन टप्प्यांमध्ये जा्त अतंर नको. याबाबत विविध पक्षाच्या नेत्यांना पत्र लिहिले असून याबाबत एकमत करण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे ते म्हणाले.

निवडणुका दीड ते दोन महिन्यांपर्यंत चालवण्याची गरजच काय, असा सवाल त्यांनी केला. आता निवडणुका शांततेने पार पडत आहेत. आमची सत्ता येण्यापूर्वी 15 वर्षे निवडणुकीच्या काळात अशांतता होती. मात्र, आता निवडणूक प्रक्रियेत बदल झाले असून जनता निःपक्षपातीपणे मतदानाचा हक्क बजावत असल्याचे त्यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या