नीरव मोदीचा जामीन अर्ज फेटाळला; लंडनच्या न्यायालयाचा दणका

42
nirav-modi-new

सामना ऑनलाईन । लंडन

सुमारे 13 हजार 500 कोटी रुपयांच्या पीएनबी घोटाळ्यातील मुख्य आरोपी हिरेव्यापारी नीरव मोदीला लंडनच्या कोर्टाकडून पुन्हा एकदा दणका मिळाला आहे. वेस्टमिन्स्टर मॅजिस्ट्रेट कोर्टाने शुक्रवारी नीरव मोदीचा जामीन अर्ज दुसऱ्यांदा फेटाळला आहे. त्यामुळे त्याला न्यायालयाकडून दिलासा मिळालेला नाही. तसेच या प्रकरणी पुढील सुनावणी 24 मे रोजी होणार आहे.

जामीन अर्जाच्या सुनावणीवेळी न्यायालयात नीरवचे वकील उपस्थित होते. तर नीरव मोदी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी झाला होता. याआधी गेल्या महिन्यात 29 मार्चला त्याचा जामीन अर्ज फेटाळात त्याला 26 एप्रिलपर्यंत कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले होते. या प्रकरणी पुढील सुनावणी 24 मे रोजी होणार आहे. नीरव मोदीला 29 मार्चला वेस्टमिस्टर न्यायालयात हजर करण्यात आले होते. मोदीचे वकील आनंद दुबे यांनी बाजू मांडली होती. मात्र, या प्रकरणात बँकेचे खूप मोठे नुकसान झाले आहे आणि पुरावे नष्ट करण्यात आले आहेत. हा फसवणुकीचा मोठा गुन्हा आहे, असे सांगत न्यायालयाने त्याला जामीन नाकरला होता. आता दुसऱ्यांदा त्याला जमीन नाकरण्यात आला आहे. नीरव मोदी जानेवारी 2018 पासून ब्रिटनमध्ये आहे.

आपली प्रतिक्रिया द्या