मंडईनंतर आता उद्यानातही प्लॅस्टिकला नो एण्ट्री, आदित्य ठाकरे यांना आयुक्तांचे आश्वासन

सामना प्रतिनिधी, मुंबई

पावसात गटारे आणि पंपिंग स्टेशन तुंबवणाऱ्या प्लॅस्टिकच्या पिशव्यांवर मुंबईत बंदी आणावी या मागणीसाठी आज युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी पालिका आयुक्त अजोय मेहता यांची भेट घेतली. प्लॅस्टिक पिशव्यांवर टप्य्याटप्प्याने बंदी आणू, असे आश्वासन यावेळी आयुक्तांनी आदित्य ठाकरे यांना दिले.

युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी आज पहाटे वांद्रे बॅण्डस्टॅण्ड येथे स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतल्यानंतर सकाळी पालिका मुख्यालयात येऊन आयुक्तांची भेट घेतली व विविध विषयांवर चर्चा केली. यावेळी त्यांच्यासोबत सभागृह नेते यशवंत जाधव उपस्थित होते. यावेळी त्यांनी प्लॅस्टिकच्या घातक परिणामांबद्दल आयुक्तांना माहिती दिली व प्लॅस्टिकबंदीची मागणी केली. त्यावर सध्या पालिकेच्या मंडईमध्ये प्लॅस्टिकच्या पिशव्यांवर बंदी घालण्यात आली आहे.

रुफ टॉप पॉलिसी हवी, पण सर्वसंमतीने
यावेळी आदित्य यांनी आयुक्तांशी रुफ टॉप पॉलिसीबाबतही चर्चा केली. या धोरणाला भाजप आणि काँग्रेसने विरोध दर्शवला आहे. मात्र या धोरणामुळे लोकांना रोजगार उपलब्ध होणार असून पालिकेलाही महसूल मिळू शकतो. परंतु ही पॉलिसी लोकशाही मार्गाने सर्वसंमतीने मंजूर व्हावी अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.

पॉलिसीमध्ये सुधारणा करणार
हे धोरण सर्व पक्षांच्या संमतीने मंजूर व्हावे अशी युवासेना प्रमुखांची इच्छा आहे. त्यामुळे या धोरणात अजून सुधारणा करण्याचा आमचा विचार आहे. सभागृहाने एकमताने हे धोरण मंजूर करावे यासाठी सगळय़ांच्या सूचनांचा समावेश करून रुफ टॉप हॉटेलांमध्ये शौचालयांची सुविधा, फायर फायटिंग, आपत्कालीन मार्ग, ओला कचऱ्याची विल्हेवाट अशा विविध अटी घालाव्या असा आमचा प्रयत्न आहे. – यशवंत जाधव, सभागृह नेते