सुट्टीची सूचना उशिरा मिळाली, मुंबई, उपनगरातील अनेक शाळा भरल्या

फोटो- प्रातिनिधीक

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, ‘भारतरत्न’ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबई व उपनगर जिह्यातील सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांबरोबर शाळांना स्थानिक सुट्टी जाहीर करण्यात आली होती. मात्र सुट्टीची सूचना उशिरा मिळाल्याने अनेक खासगी शाळा सकाळच्या सत्रात सुरू होत्या.

शासकीय सुट्टी शहर आणि उपनगर परिसरात जाहीर करण्यात आली, मात्र त्या परिपत्रकात शासकीय कार्यालय असा उल्लेख होता. शाळांचा उल्लेख नसल्याने मंगळवारी रात्री उशिरापर्यंत गोंधळ सुरू होता. सरकारने सुट्टी जाहीर केल्यानंतर तातडीने शिक्षण उपसंचालक कार्यालयाने शाळांना सूचना द्यायला हव्या होत्या. अनेक पालकांना सूचना न मिळाल्याने काही शाळा सुरू होत्या, मात्र नंतर विद्यार्थ्यांना सोडण्यात आले. सुट्टीचा निर्णय चार दिवस अगोदर घेणे गरजेचे होते आणि सर्व सूचना शाळांना देणे गरजेचे होते, असे शिक्षक राजेश पंडय़ा यांनी सांगितले.