हुंडाबळी प्रकरणात लगेच अटक नको! सर्वोच्च न्यायालयाचा आदेश

4

सामना ऑनलाईन, नवी दिल्ली

हुंड्यासाठी छळ झाल्याची तक्रार विवाहितेने करताच आयपीसीच्या कलम ४९८ ए अन्वये तिच्या
पतीला आणि सासरच्यांना सरळ कोठडीत डांबू नका. तक्रारीची शहानिशा करूनच गुन्हा दाखल करावा, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने आज दिले. न्यायमूर्ती ए. के. गोयल आणि न्यायमूर्ती यू. यू. ललित यांच्या खंडपीठाने हा आदेश दिला.

हुंडा प्रतिबंधक कायद्याचा गैरवापर होत असल्याच्या तक्रारी देशभरात दिवसेंदिवस वाढतच चालल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने प्रत्येक जिल्ह्यात कुटुंब कल्याण समितीची स्थापना सरकारने करावी. हुंड्यासाठी छळ होत असल्याच्या तक्रारीची त्या समितीने शहानिशा करावी, अशी सूचना न्यायालयाने केली आहे.