Lok sabha 2019 जुम्म्याला मतदान नाही, निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

केंद्रीय निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकांच्या तारखा नुकत्याच जाहीर केल्या. पश्चिम बंगाल, बिहार व उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये सात टप्प्यात मतदान घेण्यात येणार आहे. मतदानाच्या दिवशी मुसलमान मतदारांचे रमझानचे रोजे असल्याने त्यांना मतदान करताना अडचण येईल असं म्हणून तृणमूल काँग्रेस आणि अन्य काही पक्षांनी तारखा बदलण्याची मागणी केली होती. मात्र, रमजान ईद आणि रमजानच्या महिन्यातील शुक्रवारी मतदानाच्या तारखा ठेवण्यात आलेल्या नाहीत, असं स्पष्टीकरण निवडणूक आयोगाने दिलं आहे.

यंदा 5 मे ते 4 जून या कालावधीत रमजानचा महिना साजरा होणार आहे. संपूर्ण महिना वगळून निवडणूक पुढे ढकलता येणार नाही, त्यामुळे रमजानचा विचार करूनच तारखा ठरवण्यात आल्याचं आयोगाने म्हटलं आहे. त्यामुळे या महिन्यातील सर्व शुक्रवार आणि मुख्य सणाचा दिवस वगळूनच मतदानाच्या तारखा ठरवण्यात आल्या आहेत, असं आयोगाने स्पष्ट केलं आहे.