हिंदुस्थानी वंशाचे नोबेल विजेते लेखक व्ही. एस. नायपॉल यांचे निधन

व्ही.एस.नायपॉल, साहित्यिक

सामना ऑनलाईन । लंडन

साहित्यातील नोबेल पुरस्कार जिंकणाऱ्या हिंदुस्थानी वंशाचे लेखक व्ही. एस. नायपॉल यांचे रविवारी निधन झाले. ते ८५ वर्षांचे होते. लंडन येथील आपल्या घरात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. २००१ साली त्यांना नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं.

व्ही. एस. उर्फ विद्याधर सूरज नायपॉल यांचा जन्म १७ ऑगस्ट १९३२ रोजी त्रिनिदाद येथे झाला होता. त्रिनिदाद येथेच त्यांचं बालपण गेलं. ऑक्सफर्ड विद्यापीठातून त्यांनी आपलं शिक्षण पूर्ण केलं. ए बेंड इन द रिव्हर, अ हाऊस ऑफ मिस्टर बिस्वास, इन अ फ्री स्टेट, ए वे इन द वर्ल्ड, हाफ अ लाईफ, मॅजिक सीड्स या त्यांच्या गाजलेल्या साहित्यकृती आहेत. याखेरीज नायपॉल यांनी ३० हून अधिक पुस्तकं लिहिली आहेत. त्यातून त्यांना सामाजिक पातळीवरील अनेक क्रांतिकारक विचार मांडले.

साहित्यातील योगदानासाठी त्यांना विविध पुरस्कारही मिळाले आहेत. १९७१ साली त्यांना बुकर पुरस्काराने गौरवण्यात आलं. तर २००१ मध्ये त्यांना साहित्यातील नोबेल पुरस्कार मिळाला होता.