हिंदुस्थानी बाजारात नोकियाचे ३ मोबाईल दाखल

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

अखेर नोकिया प्रेमींची प्रतिक्षा संपली आहे. नोकियाने हिंदुस्थानात नोकिया ३, नोकिया ५ आणि नोकिया ६ असे तीन दमदार स्मार्टफोन लाँच केले आहेत. नोकिया ३ ची किंमत सर्वात कमी ९,४९९ आहे. तर नोकिया ५ ची किंमत १२,८९९ आणि नोकिया ६ ची किंमत १४,९९९ एवढी असणार आहे. या स्मार्टफोनपैकी नोकिया ३ चे बुकिंग १६ जूनपासून, तर नोकिया ५ चे बुकिंग ७ जुलैपासून करता येणार आहे. नोकिया ६ या स्मार्टफोनचे बुकिंग १४ जुलैपासून करता येणार आहे.

नोकिया ३ –

१. ५ इंचाचा एचडी डिस्प्ले
२. २ जीबी रॅम
३. १६ जीबी इंटरर्नल मेमरी
४. ८ मेगापिक्सलचा रिअर आणि फ्रंट कॅमेरा
५. डिस्प्ले फ्लॅश
६. हा फोन सिल्वर व्हाईट, मॅट ब्लॅक, ब्यू आणि कॉपर व्हाईट रंगात उपलब्ध असेल
७. २६५० एमएचची बॅटरी
८. ४ जी सपोर्ट

नोकिया ५ –

१. ५.२ इंचांचा आईपीएस डिस्प्ले
२. २ जीबी रॅम
३. १६ जीबी इंटरर्नल मेमरी
४. सिंगल आणि ड्युअल सीमचा ऑप्शन
५. १३ मेगापिक्सल रिअर आणि ८ मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा
६. हा स्मार्टफोन सिल्वर, ब्लॅक कॉपर आणि ब्लू रंगात उपलब्ध असेल
७. ३००० एमएचची दमदार बॅटरी

नोकिया ६ –

१. ५.५ इंचांचा फुल एचडी डिस्प्ले
२. ४ जीबी रॅम
३. ६४ जीबी इंटरर्नल मेमरी
४. ड्युअल सीम
५. १६ मेगापिक्सल रिअर आणि ८ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा
६. डॉल्बी एटमस तंत्राचा वापर
७. ३००० एमएचची बॅटरी