नोकियाचा नवा मोबाईल, महिनाभर बॅटरी चालणार

4

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

एकदा मोबाईल चार्ज केला तर किमान महिनाभर तरी त्या मोबाईलची बॅटरी उतरणार नाही. विश्वास बसत नाही ना, पण हे खरे आहे. नोकिया लवकरच Nokia TA -1139 हा मोबाईल फोन सादर करणार आहे. या मोबाईलची बॅटरी तब्बल महिनाभर चालणार आहे.

नोकिया पुढील महिन्यात बार्सिलोना येथे होणाऱया मोबाईल वर्ल्ड काँग्रेसमध्ये (एमडब्लूसी) अनेक नवीन स्मार्टफोन सादर करणार आहे. 24 फेब्रुवारी रोजी होणाऱया एमडब्लूसीमध्ये Nokia 9 PureView आणि Nokia 6.2 या स्मार्टफोनसह आणखी एक फिचर फोन सादर करणार आहे. Nokia TA -1139 असे या फोनचे नाव असून या फोनचा डिस्प्ले 2.4 इंच तर रिसोल्यूशन 240×300 पिक्सल इतके आहे. या मोबाईल फोनची बॅटरी तब्बल एक महिना टिकणार आहे.

Nokia TA -1139 ची वैशिष्टय़े
z 8 एमबी रॅम, 16 एमबी इंटरनल स्टोअरेज. z 1020 एमएएच बॅटरी. – एलईडी फ्लॅश, 3 मेगापिक्सल रियर कॅमेरा. z 120.8x 53.49x 13.82 mm डायमेंशन. – 83.6 ग्रॅम वजन. – लाल, राखाडी, काळ्या रंगांत मोबाईल फोन उपलब्ध.