पात्रता नसलेल्यांना सत्तेत पद, पात्र असलेले मात्र बाहेरच!

सामना प्रतिनिधी । जळगाव

भाजपचे असंतुष्ट नेते एकनाथ खडसे यांचा आपल्या पक्षाविरोधातील खडखडाट सुरूच आहे. आज लेवा पंचायतीच्या पाडळसे येथील राष्ट्रीय महाअधिवेशनात त्यांनी पुन्हा एकदा आपल्या पक्षाला लक्ष्य केले असून ‘ज्यांची पात्रता नाही त्यांना सत्तेत पद मिळते आणि ज्यांची पात्रता आहे ते मात्र बाहेर आहेत’ अशा शब्दांत त्यांनी आज भाजपवर तोंडसुख घेतले.

यावल तालुक्यातील भोरगाक येथे लेका पंचायतीच्या कतीने पाडळसे या गावी लेका पाटील समाजाचे राष्ट्रीय महाअधिकेशन आज झाले. यावेळी आमदार खडसे यांनी पुन्हा एकदा मनातील सल बोलून दाखविली.

आमदार खडसे म्हणाले, सरदार कल्लभभाई पटेल यांचा जन्म आपल्या देशात झाला हे भाग्य आहे. त्यांच्या कार्यामुळे ते लोहपुरुष ठरले क त्यांच्यामुळे देशाची प्रगती झाली. त्यांच्या पात्रतेमुळे ते तिथपर्यंत पोहचले. आजची राजकीय स्थिती मात्र नेमकी याच्या उलट आहे. जे लायक आहे ते बाहेर आहेत, ज्यांची पात्रता नाही त्यांना मात्र सत्तेत पदे मिळतात अशा शब्दांत आमदार खडसे यांनी आपल्या मनातील संतापाला वाट मोकळी करून दिली.