मुंबईची नॉनव्हेज खाऊगल्ली

नॉनव्हेजतोंडाला पाणी सुटले. मुंबईत काही ठिकाणी चमचमीत नॉनव्हेज मिळते. ते एकदा तरी ट्राय करून पाहायला काहीच हरकत नाही.

> मुंबईतील गिरगावात समर्थ भोजनालय आहे. तेथे मासे आवर्जून खा. बसने ठाकुरद्वार बसस्टॉपला उतरल्यावर ‘मिरबत लेन’ची चौकशी करायची. बस रुटपासून फक्त दोनच मिनिटाच्या अंतराकर हे हॉटेल आहे.

> कोकण्यांची खरी खानावळ हवी असेल तर वांद्रे येथील हॉटेल हायवे गोमंतक येथे जावेच लागेल.

> दादरच्या शिवसेना भवनच्या बाजूला असलेलं ‘सायबीण’, दादरचेच ‘गोमांतक’, शिवाजी पार्क येथील ‘सिंधुदुर्ग’ किंवा उत्तम कोंबडी-कडे आणि सागुती पुरवणारे घरगुती उपाहारगृह ‘क्षीरसागर’ ही काही खास नावं.

> दादरहून थोडं दूर जायचं तर सायन येथील ‘योगी’, चेंबूरचे ‘वैशाली’, विलेपार्ले (पूर्व) येथील समर हारवेस्ट व गजाली किंवा दहिसर चेकनाक्याजवळ असलेलं ‘दारा दा धाबा’ हीदेखील मांसाहारासाठी प्रसिद्ध ठिकाणे आहेत.

> फक्त मांसाहारासाठी म्हटलं तर फिरोजशहा मेहता रोडवरील ‘महेश लंच होम’, बोरा बाजारमधील ‘संदीप गोमांतक’, फिरोजशहा मेहता रोडवरचेच ‘अपूर्व लंच होम’  हे हॉटेल आहे..