नार्कोजचा चौथा सीजन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, टीजर लाँच

1

सामना ऑनलाईन । मुंबई

नेटिफ्लिक्सवरील नार्कोज ही ड्रग्ज माफियावरील सिरीज जागतिक स्तरावर तुफान लोकप्रिय झाली होती. पहिले दोन सीजन हे कोलंबियातील पाब्लो एस्कोबार या ड्रग्ज माफियावर आधारित होते. पाब्लो एस्कोबारवरील दोन सीजन प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्यानंतर नेटफ्लिक्सने तिसरा सीजनची निर्मिती केली होती. तिसरा सीजन हा कोलंबियातील काली कार्टेल या ड्रग माफियावर आधारित होता. त्यानंतर नार्कोजचा चौथा सीजन येणार का याबद्दल प्रेक्षकांमध्ये चांगलीच उत्सुकता होती. नेटफ्लिक्सने वर्षभरापूर्वी चौथ्या सीजनची घोषणा करून दोन टीजरही लाँच केले होते, परंतु या टीजरमध्ये प्रदर्शनाची तारीख आणि कथानकाबद्दल काहीच संकेत नव्हते.

चौथे सीजन हे मेक्सिकोमधील ड्रग व्यवसायावार आधारित असेल अशी अंधुक कल्पना देणारे पोस्टर नेटफ्लिक्सने जुलैमध्ये प्रदर्शित केले होते. पण नेटफ्लिक्सने नवे टीजर लाँच करून प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे.

नार्कोसचे चौथे सीजन 16 नोव्हेंबर ला प्रदर्शित होणार आहे. मेक्सिकोमधील या ड्रग्जचा व्यवसाय कसा होता, जाव्हिए पेन्यासमोर काय आव्हाने असतील असे अनेक प्रश्न या नवीन सीजनमुळे सुटतील.