जनरलला नरभक्षी माश्यांच्या टँकमध्ये फेकले… हुकूमशहा किम जोंगचा क्रूरपणा

26

सामना ऑनलाईन। प्योंगयांग

उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग हा त्याच्या क्रूरकृत्यांसाठी नेहमीच चर्चेत राहिला आहे. मात्र त्याच्या याच क्रूरतेचा नवीन चेहरा पुन्हा एकदा जगासमोर आला आहे. काही दिवसांपूर्वी किमने एका जनरलला ‘पिरान्हा’ या नरभक्षी माश्यांच्या टँकमध्ये फेकण्याची शिक्षा देत मृत्यूदंड ठोठावला. विशेष म्हणजे माशांचा हा टँक त्याच्या अंगणातच असून मासे जनरलचे कसे लचके तोडत आहेत हे किम बेडरुमच्या खिडकीतून बघत होता. जनरलच्या प्रत्येक किंकाळीला किम हसत होता. त्याचे ते आसूरी हास्य बघून त्याचे कर्मचारीही हादरले होते.

डेली स्टार या वृत्तसंस्थेने याबद्दल माहिती दिली असून जनरलमुळे आपली सत्ता धोक्यात येण्याची शक्यता असल्याची भिती वाटल्यानेच किमने त्याला नरभक्षी माशांच्या हवाली केले. 1965 साली जेम्स बॉंडचा ‘यू ओनली लिव्ह ट्वाइस’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटातील एका दृश्यापासून प्रेरणा घेत किमने जनरलला पिरान्हाच्या टँकमध्ये फेकल्याचे डेली स्टारने म्हटले आहे.

दरम्यान याआधीही किमने अमानवीय पद्धतीने अनेक अधिकाऱ्यांच्या हत्या केल्याच्या चर्चा यायच्या. मात्र यातील बरेच अधिकारी जिवंत असल्याचे नंतर समोर आले. तसेच अमेरिकेबरोबरची बोलणी फिसकटल्याने सनकी किमने ज्या सोळा अधिकाऱ्यांचा समावेश अमेरिकेत किमबरोबर गेलेल्या मंत्रिमंडळात होता त्यांना जीवे मारण्याची शिक्षा सुनावली होती. पण यात तथ्य किती ते अद्यापपर्यंत पुढे आलेच नाही.

पण आता जनरलला पिरान्हाच्या पुढ्यात टाकणाऱ्या किमला सगळा देश कंटाळला आहे. त्यातच जनरलचे नावही जाहीर न करण्याचे आदेश किमने दिले आहे. यामुळे तो जनरल नेमका कोण होता. याबद्दल लोकांची उत्सुकता वाढत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या