नॉर्टनची वाय-फाय सिक्युरिटी

46

‘फ्री वाय-फाय’ सुविधा आता सर्वच सार्वजनिक ठिकाणी उपलब्ध होण्यास सुरुवात झाली आहे. रेल्वे स्टेशन, बस स्थानके, मॉल्स, हॉटेल्स अशा सर्वच ठिकाणी आता ग्राहकांसाठी मोफत वाय-फायची सेवा उपलब्ध करून देण्यात येते. लोकंसुद्धा मुक्तपणे या सेवेचा वापर करत असतात. मात्र ही सार्वजनिक सेवा वापरत असताना, अनेकदा सुरक्षेकडे दुर्लक्ष होते आणि हॅकर्स त्याचा फायदा घेतात. मोबाईलमधील महत्त्वाची माहिती अगदी सहजपणे हे हॅकर्स चोरी करतात. आता अशा धोक्यांपासून सुरक्षेसाठी नॉर्टन या जगप्रसिद्ध ऍण्टिव्हायरस उत्पादकांतर्फे वाय-फायच्या सुरक्षित वापरासाठी टूल बनविण्यात आले आहे. वाय-फाय, वायरलेस हॉट स्पॉट अशा अनेक सुविधा वापरताना या टूलमुळे मोबाईलला भक्कम सुरक्षा कवच लाभणार आहे. माहितीची चोरी करणे या टूलमुळे अशक्यच बनणार असल्याचा कंपनीचा दावा आहे. वर्षाला २४९९ रुपयांत ही सेवा ग्राहकाला खरेदी करता येणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या