महिलांसाठी अशक्य असं काहीही नाही!: स्टंट वूमन

कविता लाखे…[email protected]

सध्याच्या काळात जवळजवळ सगळ्याच क्षेत्रात महिला पुरुषांबरोबर काम करताना दिसतात. मग ते राजकारण असो, तिन्ही सुरक्षा दल असो कि सरकारी वा खासगी नोकरी आज सगळीकडेच महिलांचा वावर आहे. पण असंही एक क्षेत्र आहे जिथे काम करणं महिलांसाठी आजही आव्हानात्मक आहे. ते क्षेत्र आहे चित्रपटात स्टंट करणं. हिरोईनच्या जागी स्व:ताचा जीव धोक्यात घालून तो शॉट ओके करणे आणि पडद्यावर मात्र त्याचे श्रेय हिरॅाईनला जात असल्याचं बघणं. असं हे थँकलेस स्टंट करणं नाही जमत सगळ्याच जणींना. पण वाघिणीच्या काळजाच्या शालिनी सोनीने हे आव्हान स्विकारलं आणि घरातल्यांचा विरोध स्विकारुन ती स्टंट वूमन झाली.

मारवाडी कुटुंबात जन्माला आलेली शालिनी मुळची राजस्थानची. पण सध्या कामानिमित्त ती मुंबईत स्थिरावली आहे. शालिनीला लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. यामुळे शिक्षण घेतानाच तिनं थिएटरही जोडल. कॉलेज व व्यावसायिक नाटकातही तिनं अभिनय केला. याच आवडीपायी तिने मुंबई गाठली. पण बॉलिवुडमध्ये हिरोईन होणं इतक सोप नाही हे तिनं वेळीच ओळखलं आणि आलेल्या अनुभवातून शहाण होतं आपला मार्गच बदलला आणि ती स्टंट वूमन झाली.

shalini-3

आधीपासूनच मी थोडे मस्तीखोर होते. पण मुलगी असल्याने थोडं दडपणं असायचच. त्यातच मी मारवाडी कुटुंबातली. आमच्या घरात रुढी, परंपरा, संस्कृति जपली जाते. यामुळे माझा मुंबईला जाण्याचा निर्णय सुरुवातीला घरातल्यांना मान्य नव्हता. पण नंतर सगळं ठिक झालं. त्याच विश्वासावर मी मुंबईत आले. पण मी मजबूत होते. यामुळेच मी या इंडंस्ट्रीमध्ये टिकल्याच शालिनीने सांगितलं. प्रांत कोणताही असो महिलांना सगळीकडे सारख्याच अडचणींचा सामना करावा लागतो. पण जर मी फक्त स्त्री असल्याचाच विचार करत बसले असते तर कदाचित आज मी या पोझिशनवर पोहचलेच नसते. कदाचित मी एक स्त्री असल्यानेच एवढी खंबीर आहे अस मला वाटतं. यामुळे बऱ्याचवेळा जेव्हा मी बघते कि महिला त्याच्या स्त्री असण्याचा स्तोम करतात व काहीच करायचा प्रयत्न करत नाहीत तेव्हा मला राग येतो. कारण तुम्ही स्त्री आहात म्हणूनच वेगळ्या आहात. पुरुषांपेक्षा जास्त सहनशक्ती व धैर्य स्त्रियांमध्येच आहे हे प्रत्येक स्त्रीने ओळखायलाच हव अस शालिनी आवर्जून सांगते.

महिलांनी फिटनेस बाबत आग्रही असाव अस शालिनीच म्हणण आहे. स्टंट करताना तिला या गोष्टी प्रकर्षाने जाणवतात. म्हणून खाण्यापिण्याबरोबरच जीम ती नियमित करते. हा नियम सगळ्याच स्त्रियांनी कटाक्षाने पाळायला हवं अस तिला वाटतं. कारण नोकरी करणाऱ्या स्त्रियांना ऑफिसबरोबरच घरही सांभाळायच असत तर गृहिणींना घराबरोबरच सगळ्या कुटुंबाची काळजी घ्यायची असते. यामुळे स्त्रियांनी स्वताला कधीही कमी लेखू नये. मनात आलं तर स्त्रियांना अशक्य अस काहीच नाही. फक्त मनात दुर्दम्य ईच्छा हवी.
कारण स्वत:मधले हे सर्व गुण शालिनीने वेळीच ओळखले व ती स्टंट वूमन झाली आहे. तिने अनेक हिंदी व प्रादेशिक भाषांमधील चित्रपटात हिरोईनसाठी स्टंट केले आहेत. बागी,बादशाहो, हसीना पारकर, भूमी, जॉनी एल एल बी हे तिचे नुकतेच प्रदर्शित झालेले चित्रपट आहेत. यातील तिच्या फाईट सीन्सचे सगळ्यांनीच कौतुक केलं पण याचे श्रेय ती तिच्या मास्टरर्सला देते. कारण मला माझ्यातली ताकद ओळखण्यासाठी स्टंट वूमन बनण्याचा सल्ला त्यांनीच दिला जी माझी एक नवीन ओळख आहे. अस शालिनी मोठ्या अभिमानाने सांगते