उत्तान कपडे घालून मॉडेल मंदिरात नाचली, प्रशासनातर्फे नोटीस

सामना ऑनलाईन, उज्जैन

जगभरात प्रसिद्ध असलेल्या मध्य प्रदेशातील महाकाल मंदिरात एका मॉडेलने उत्तान कपडे घालून स्वत:चा व्हिडीओ चित्रीत केला आहे. नंदिनी कुरील असं या मॉडेलचे नाव असून ती अॅपद्वारे चित्रीत केलेल्या व्हिडीयोमध्ये वेगवेगळ्या गाण्यांवर हावभाव करताना नाचताना दिसतेय.

३ सप्टेंबरला  तरुणीने हा व्हिडीओ चित्रीत केला असून या व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मंदिर प्रशासन खडबडून जागं झालंय. प्रशासनाने या मॉडेलला आता नोटीस पाठवून तिच्याकडून खुलासा मागवला आहे.

पवित्र भिंतीसमोर मॉडेलचे नग्न फोटोशूट, जगभरात खळबळ

या मंदिरामध्ये गेल्या काही दिवसांत वाट्टेल ते प्रकार करण्यात आले आहे. १ जानेवारीला एक महिला कुत्र्याला घेऊन मंदिरात दर्शनासाठी गेली होती. त्यानंतर एक माणूस पाळीव पोपट घेऊन संध्याकाळच्या आरतीला येऊन बसला होता. त्यानंतर भाजयुमोचे काही कार्यकर्ते येऊन भगवान शंकरासमोरील नंदीला छर्रे अर्पण करून गेले होते. आता या मॉडेलच्या नाचकामामुळे मंदिर प्रशासन पुन्हा एकदा टीकेच्या भोवऱ्यात सापडलं आहे. या मॉडेलला भस्मारतीसाठी परवानगी देण्यात आली होती ती मंदिरावर नेमण्यात आलेले प्रशासक अभिषेक दुबे आणि जिल्हाधिकारी मनीषसिंह यांच्याच अनुमतीने देण्यात येते. या दोघांपैकी कोणीतरी एकाने ही परवानगी या मॉडेलला दिली आहे. ती कोणी दिली याची माहिती जाणून घेण्यासाठी या मॉडेलला नोटीस पाठवण्यात आली आहे.