जोकोविचला तिसऱ्यांदा यूएस ओपनचे जेतेपद, पीट सॅप्रासच्या विक्रमाची केली बरोबरी

6


सामना ऑनलाईन, न्यूयॉर्क

सर्बियाच्या नोवाक जोकोविचने कारकीर्दीत तिसऱ्यांदा अमेरिका ओपन ग्रॅण्ड स्लॅम टेनिस स्पर्धेच्या करंडकावर आपले नाव कोरले. त्याने किताबी लढतीत अर्जेंटिनाच्या जुआन डेल पोत्रोचा 6-3, 7-6 (7/4), 6-3 असा पराभव करून यंदाच्या हंगामात सलग दुसरे ग्रॅण्ड स्लॅम जेतेपद जिंकले. याचबरोबर जोकोविचने कारकीर्दीतील 14व्या ग्रॅण्ड स्लॅम जेतेपदाला गवसणी घालून अमेरिकेचे महान टेनिसपटू पीट सॅप्रासच्या विक्रमाची बरोबरी केली.

जोकोविच सर्काधिक ग्रॅण्ड स्लॅम पदके जिंकणाऱ्या खेळाडूंमध्ये रॉजर फेडरर (20) आणि राफेल नदाल ( 17) यांच्यानंतर तिसऱ्या स्थानी आहे. त्याने 2011 क 2015 मध्ये अमेरिकन ओपनचे जेतेपद पटकावले होते. गतवर्षी हाताच्या दुखापतीमुळे जोकोविचला या स्पर्धेत सहभागी होता आले नव्हते.

उपांत्य लढतीत तृतीय मानांकित जुआन डेल पोत्रोने राफेल नदालला कडकी झुंज दिली होती. दुखापतीमुळे नदालला अर्ध्या लढतीतून माघार घ्यावी लागल्याने डेल पोत्रो तब्बल 9 वर्षांनंतर अंतिम फेरीत दाखल झाला होता. मात्र, नदालविरुद्धची लय त्याला अंतिम सामन्यात राखता आली नाही. जोकोविचला डेल पोत्रोने केवळ दुसऱ्या सेटमध्येच कडवी लढत दिली. मात्र, ट्रायब्रेकपर्यंत ताणलेला हा सेटही जोकोविचनेच जिंकला. 2009मध्ये रॉजल फेडररला हरवून अमेरिका ओपनचा किताब जिंकणाऱ्या जुआन डेल पोत्रोचे दुसऱ्यांदा ही स्पर्धा जिंकण्याचे स्वप्न अखेर भंगले.  जोकोविचने डेल पोत्रोला ग्रॅण्ड स्लॅम स्पर्धेत पाचव्यांदा, तर एकूण 15व्यांदा पराभूत केले.

एफए बॉईज, कांजूरमार्ग यांच्याकडून फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून शिवसेनेचे आमदार सुनील राऊत यांनी फुटबॉलला किक मारून स्पर्धेचे दिमाखात उद्घाटन केले. याप्रसंगी नगरसेविका सुवर्णा करंजे, उपविभागप्रमुख आनंद पाताडे, शाखाप्रमुख प्रभू गवस यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते या मान्यवरांची उपस्थिती होती.

आपली प्रतिक्रिया द्या