अमेरिकन ओपन ग्रॅण्डस्लॅम टेनिस; डेल पोत्रो-जोकोविच जेतेपदासाठी भिडणार

सामना ऑनलाईन । न्युयॉर्क

जेतेपदाचा प्रबळ दावेदार असलेल्या नोवाक जोकोविचने उपांत्य लढतीत 21 व्या मानांकित केई निशिकोरीचा 6-3, 6-4, 6-2 असा सरळ सेटमध्ये पराभव करून अंतिम फेरीत धडक दिली. जोकोविचने 2 तास 23  मिनिटांत सामना जिंकून निशिकोरीवर वर्चस्व गाजवले. जोकोकिचने यंदाच्या किम्बल्डन ओपन स्पर्धेच्या किजेतेपदाचा मान मिळकला असल्यामुळे अमेरिकन ओपन जिंकून किक्रमी कामगिरी करण्याची चांगली संधी त्याच्याकडे असेल.

दुखापतीमुळे नदालने अर्ध्यावर सामना सोडला

वारंवार होणार्‍या दुखापतींचा विपरीत परिणाम माझ्या कारकीर्दीवर होईल असे म्हटले जात होते. पण मी आजही टेनिस कोर्टवर आहे. कारण या खेळावर माझे जीवापाड प्रेम आहे. टेनिस हेच माझे वेड आहे. आता दुखापतीवर मात करीत पुन्हा एकदा झोकात पुनरागमन करीन.