‘लंकादहन’नंतर आता घरात कांगारूंशी सामना

सामना ऑनलाईन । मुंबई

श्रीलंका दौऱ्यात विजयाची नवमी साजरी केल्यानंतर हिंदुस्थानचा संघ घरच्या मैदानावर कांगारूंसोबत दोन हात करणार आहे. लंकेविरुद्ध कसोटी मालिकेत ३-०, एकदिवसीय मालिकेत ५-० आणि एकमेव टी-२० मध्ये हिंदुस्थानने विजय मिळवला होता. एकाच दौऱ्यात सलग ९ सामने जिंकण्याचा पराक्रम कोहली ब्रिगेडने केला होता.

लंकेविरुद्ध निर्भेळ यश मिळवल्यानंतर हिंदुस्थानचा सामना बलाढ्य ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणार आहे. सप्टेंबरच्या मध्यावर कांगारूंचा संघ हिंदुस्थानच्या दौऱ्यावर येणार आहे. या दौऱ्यात ५ एकदिवसीय सामने आणि तीन टी-२० सामन्यांची मालिका खेळवण्यात येणार आहे. १७ सप्टेंबरपासून या दौऱ्याची सुरुवात होणार आहे. या दौऱ्याचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.
हिंदुस्थान-ऑस्ट्रेलिया मालिकेचे वेळापत्रक –
एकदिवसीय मालिका-
पहिला सामना – १७ सप्टेंबर, चेन्नई
दुसरा सामान – २१ सप्टेंबर, कोलकता
तिसरा सामना – २४ सप्टेंबर, इंदोर
चौथा सामना – २८ सप्टेंबर, बंगळुरू
पाचवा सामना – १ ऑक्टोबर, नागपूर

टी-२० मालिका-
पहिला सामना – ७ ऑक्टोबर, रांची
दुसरा सामना – १० ऑक्टोबर, गुवाहाटी
तिसरा सामना – १३ ऑक्टोबर, हैदराबाद