आता इंग्लंड, ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी सज्ज

40
bhuvneshwar-kumar

सामना ऑनलाईन । केपटाऊन

दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर कसोटी मालिकेत हिंदुस्थानला २-१ फरकाने हार पत्करावी लागली. मात्र त्यानंतर आम्ही एकदिवसीय व टी-२० मालिका जिंकून इतिहास घडविला. या दोन मालिका विजयामुळे नक्कीच आमचे मनोबल उंचावले असून आता इंग्लंड व ऑस्ट्रेलिया दौऱयावर आणखी चांगली कामगिरी करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत, असा इशारा ‘टीम इंडिया’चा प्रमुख वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारने दिला आहे.

दक्षिण आफ्रिकेचा दौरा संपल्यानंतर भुवनेश्वर म्हणाला, एकूण दौरा खऱ्या अर्थाने संस्मरणीय ठरला. विशेषतः कसोटी मालिका अधिक चुरशीची झाली. आम्ही दोन लढती गमावल्या, पण दक्षिण आफ्रिकेला सहजासहजी जिंकू दिले नाही. आम्ही ही कसोटी मालिका ०-३ फरकाने हरू शकत होतो किंवा २-१ फरकाने जिंकूही शकत होतो. मात्र दक्षिण आफ्रिकेमध्ये आम्ही ज्या पद्धतीने खेळलो त्यामुळे नक्कीच संघातील प्रत्येकाचे मनोबल उंचावले आहे. हाच आत्मविश्वास आम्हाला आगामी इंग्लंड व ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर कामी येईल.

‘टी-२० क्रिकेटमध्ये फक्त चार षटके गोलंदाजी मिळते. क्रिकेटच्या या छोटया स्तरामध्ये तीन चेंडूनेही सामन्याचे समीकरण बिघडवू शकते. त्यामुळे प्रत्येक चेंडू विचार करून टाकावा लागतो. कसोटी किंवा एकदिवसीय क्रिकेटमध्ये दोन-तीन षटके प्रयोग करता येतात, मात्र टी-२०मध्ये आधीच योजना तयार करून मैदानावर उतरावे लागले.’

आपली प्रतिक्रिया द्या