महिला मतदारांचा टक्का वाढला!

सामना प्रतिनिधी । मुंबई

लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असून उमेदवार निवडीची लगीनघाई सुरू आहे. लोकसभा निवडणुकीतील तिकीट वाटपात महिलांना प्राधान्य दिले जात नसले तरी यंदाच्या लोकसभा निवडणुकीत उमेदवार निवडीत महिला शक्ती निर्णायक ठरणार आहे. कारण मागील तीन लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत यंदा महिला मतदारांचा टक्का वाढला आहे.

2004 मध्ये पुरुष आणि महिला मतदार अशी स्वतंत्र नोंदणी केलेली नव्हती. त्यामुळे त्या वर्षी एकूण 3 कोटी 42 लाख 63 हजार 317 मतदारांची नोंदणी झाली. 2009 आणि 2014 या दोन्ही लोकसभा निवडणुकीसाठी करण्यात आलेल्या मतदार नोंदणीमध्ये महिला मतदारांची संख्या पुरुष मतदारांपेक्षा कमी होती, मात्र 2019 च्या लोकसभा निवडणुकीसाठी करण्यात आलेल्या मतदार नोंदणीत महिला मतदारांची संख्या वाढली आहे.

वर्ष व पुरुषांमागे महिलांचे प्रमाण

 • 2011- दर एक हजार पुरुषांच्या मागे 915 महिला
 • 2014- दर एक हजार पुरुषांच्या मागे 889 महिला
 • 2019- दर एक हजार पुरुषांच्या मागे 911 महिला
 • 2004 तसेच 2009 व 2014 या तुलनेत 2019 मध्ये महिलांचा टक्का वाढला
  वर्ष व लोकसभा मतदारांची संख्या
 • 2004- 3 कोटी 42 लाख 63 हजार 317
 • 2009- 7 कोटी 29 लाख 54 हजार 58 मतदार.
 • त्यापैकी 3 कोटी 81 लाख 60 हजार 162 पुरुष मतदार तर 3 कोटी 47 लाख 93 हजार 896 महिला मतदार.
 • 2014- 8 कोटी 7 लाख 98 हजार 823 मतदार.
 • त्यामध्ये 2 कोटी 66 लाख 22 हजार 180 पुरुष मतदार तर 2 कोटी 20 लाख 46 हजार 720 महिला मतदार.
 •  2019- 8 कोटी 73 लाख 30 हजार 484 मतदार त्यापैकी 4 कोटी 57 लाख 2 हजार 579 पुरुष मतदार तर 4 कोटी 16 लाख 25 हजार 819 महिला मतदार.