खतना करताना चुकून लिंग कापले, मुलाला 229 कोटींची भरपाई

प्रातिनिधिक फोटो

सामना ऑनलाईन । न्यू यॉर्क

अमेरिकेतील जॉर्जिया येथे 18 दिवसांच्या मुलाचा प्रायव्हेट पार्ट नर्सने चुकून कापला होता. या प्रकरणी न्यायालयाने त्या मुलाला 24 मिलियन पौंड म्हणजे 229 कोटी रुपये भरपाई देण्याचे आदेश देण्यात आले आहे. आता हा मुलगा 4 वर्षांचा झाला आहे.

‘द सन’ने दिलेल्या वृत्तानुसार, हा मुलगा जॉर्जिया येथील लाईफ सायकिल पेडियाट्रिक्स रुग्णालयात भरती होता. येथील मेलिसा जोन्स नावाची नर्स मुलाचा खतना करत होती. परंतु चुकून तिच्या हातून मुलाचा प्रायव्हेट पार्ट कापला गेला. यानंतर शस्त्रक्रीया करून मुलाचा प्रायव्हेट पार्ट परत जोडण्याऐवजी नर्स आणि डॉक्टरांनी तो फ्रिजमध्ये ठेऊन दिला. रक्तभंबाळ झालेल्या मुलाला नंतर घरी पाठवण्यात आले. परंतु घरी गेल्यानंतर आईच्या सर्व प्रकार लक्षात आल्याने तिने याविरोधात दाद मागितली. हा सर्व प्रकार ऑक्टोबर 2013 मध्ये झाला होता.

गेल्या चार वर्षांपासून या प्रकरणी सुनावणी सुरू होती. तसेच मुलावर उपचारही सुरू होते. या दरम्यान मुलाला लघवीस बाधा येऊ नये यासाठी त्याच्यावर शस्त्रक्रीयाही करण्यात आली. तसेच मुलगा मोठा झाल्यानंतर सर्व लैंगिक क्रीयाही करू शकेल असा विश्वास डॉक्टरांनी व्यक्त केला आहे. परंतु या शारीरिक दुर्घटनेनंतर मुलगा आणि त्याची आई मानसिक तणावात असल्याचे वकिलांनी कोर्टात सांगितले. तसेच मुलगा मोठा झाल्यानंतर त्याच्या मनात न्यूनगंड निर्माण होण्याची शक्यता आहे. तसेच त्याच्या लग्नातही अडचणी येतील. कोर्टाने दोन्ही पक्षांचा युक्तीवाद ऐकल्यानंतर मुलाला 24 मिलियन पौंड म्हणजे 229 कोटींची भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत.