ओट्स नाचणी चिला


एका लहानशा भांडय़ातील ओट्स भाजून घ्यायचे. भाजलेले ओट्सची थंड झाल्यावर त्याची मिक्सरमधून पावडर करून घ्यायची. त्यानंतर अर्धी वाटी नाचणी पिठ, 4-5 हिरव्या मिरच्या, 1 छोटा चिरलेला कांदा, एका गाजराचा किस, 12 ते 15 कढीपत्त्याची पाने, चिरलेली कोथिंबीर, अर्धा चमचा हळद, हिंग, अर्धा चमचा धणे पूड आणि चवीनुसार मीठ घाला. यामध्ये पाणी घालून एकजीव करा. आवडीनुसार भाज्याही चिरून मिसळू शकता. गरम तव्यावर तेल किंवा तूप घालून याचे घावन काढा.