कुठे कुठे जायाचं हनीमूनला ?

सामना ऑनलाईन। मुंबई

जर तुम्ही हनिमूनला जायचा प्लान करत असाल आणि त्यासाठी गुगलवर परदेशातील महागडी हनिमून डेस्टीनेशन शोधत असाल तर जरा थांबा. आधी आपल्या देशातील हनिमून डेस्टीनेशन बघा. कदाचित ही सौंदर्यस्थळे बघितल्यावर तुमचा परदेशात जाण्याचा विचार बदलू शकतो. तसेच वेळ व पैसा वाचल्यामुळे तुम्ही बजेटमधल्या हनिमूनचा आनंद घेऊ शकता.

 

jawahar-in-maha
जव्हार…जर बिझी शेड्यूलमुळे तुम्हांला मुंबई जवळच फिरायला जायच असेल तर जव्हार हे उत्तम डेस्टीनेशन आहे. मुंबईपासून १८० किलोमीटरवर असलेल्या जव्हारमध्ये महाबळेश्वर मंदिर आहे. या मंदिरात प्रार्थना केल्यास इच्छा पूर्ण होतात अशी नागरिकांची भावना आहे. येथे फिरण्याबरोबरच ट्रेकिंगही करता येते. वारली पेंटींग्ज व आदिवासींची संस्कृती येथे जवळून पाहता येते.

tarkarli-mahaतारकर्ली- मुंबईपासून अवघ्या ५४६ किलोमीटर अंतरावर असलेलं तारकर्ली सुंदर समुद्र किनारा,स्कूबा डायव्हींग आणि मासे खाण्यासाठी उत्तम ठिकाण आहे.

harsley-hill

हॉर्सले हिल… आंध्र प्रदेशमधील चित्तूरजवळ असलेलं हॉर्सले हिल स्टेशन हे एक सुंदर पर्यटनस्थळ आहे. जर तुम्हांला हिरव्यागार निसर्गात रमायला आवडत असेल. तर जोडीदाराबरोबर तुम्ही इथे निवांत वेळ घालवू शकता. तिरुपती मंदिरापासून हे स्थळ १४४ किलोमीटरवर आहे. येथील कौंडीन्य अभयारण्य, मालमा मंदिर, आणि एनव्हायर्नमेंट पार्कची अनोखी सफर तुम्हांला वेगळाच अनुभव देईल.

chakrataचकराता…उत्तराखंडमधील डेहराडून शहराजवळ वसलेलं चकराता हे पर्यटनस्थळ बर्फाळ प्रदेशात फिरायला आवडणाऱ्या कपल्ससाठीच आहे. समुद्रसपाटीपासून ७००० फूट उंचावर असलेल्या चकरातामध्ये एकूण १४ ठिकाणं अशी आहेत जी पाहण्यासारखी आहेत. येथील सौंदर्य न्याहाळताना दिवस कसा संपतो तेही कळत नाही. टायगर फॉल्स बरोबरच जर तुम्हांला मंदिरात जायला आवडत असेल तर लखवर, महासू देवता या मंदिराला अवश्य भेट दया. या मंदिराचा संबंध महाभारताशी असल्याने माहितीचा खजिना येथे सापडतो. या भागात फार वर्दळ नसल्याने फिरण्याबरोबरच निवांत वेळ घालवता येता.

dalhausie

डलहौसी… हे देखील देशातील लोकप्रिय पर्यटनस्थळांपैकी एक पर्यटनस्थळ आहे. हिवाळ्यातल येथील सौंदर्य बघून नजरेचं पारणं फिटत. या दिवसात येथे बर्फवृष्टी होत असते. कपल्ससाठी एकदम सुंदर फिरण्याचं असं हे ठिकाणं.

ranikhet-2रानीखेत…उत्तराखंडमधील रानीखेतचे हिमालयीन खोरे कपल्सला खुणावत असते. प्रेमी युगलांच हे आवडत डेस्टीनेशन आहे. हिमालयाच्या खुशीत वसलेल्या रानीखेतमध्ये आल्यानंतर अविश्वसनीय सौंदर्य अनुभवता येतं.

kodaikanal

कोडाईकनाल… हे त्याच्या हिरव्यागार सौंदर्यासाठी प्रसिध्द आहे. येथे कपल्सची मेहमीच वर्दळ असते. शांतपणे जोडीदाराबरोबर एकांत हवा असेल तर कोडाईकनाल उत्तम आहे. शिवाय येथे राहण्या खाण्यासाठी फार पैसे मोजावे लागत नाहीत.

dhanuutti

धनौल्टी…मसूरी व चंबापासून जवळ असलेले धनौल्टी हनिमून डेस्टीनेशन म्हणून प्रसिध्द आहे. गर्दीपासून लांब निसर्गाच्या सान्निध्यात जोडीदाराबरोबर वेळ घालवायचा असेल तर धनौल्टी उत्तम.

aulyखजुराहो ...मध्य प्रदेशमधील खजुराहोबद्दल आपण पुस्तकात वाचलेले आहेच. येथील प्राचीन मुर्ती व नक्षीकाम जगप्रसिध्द आहेत. पण इथल्या औली हिल स्टेशनबद्दल फार कोणाला माहित नाही. हिवाळ्यात येथील हिमालयाच्या कडांवरून स्किईंग केली जाते. यामुळे आता अनेक जोडपी हनिमूनबरोबरच साहसी खेळ अनुभवण्यासाठी येथे येवू लागली आहेत.