कर्जमाफीची मागणी करणाऱ्या शेतकऱ्यांवर नगरमध्ये गुन्हा, वाचा काय दिलं कारण

farmer-parishad-nagar

सामना प्रतिनिधी । नगर

भारतीय किसान सभेच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयावर विनापरवाना मोर्चा काढल्या प्रकरणी किसान सभेच्या राज्य सरचिटणीस डॉ. अजित नवले यांच्यासह 250 ते 300 शेतकऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नगरमधील कोतवाली पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नगर येथे जिल्हा सैनिक लोन मध्ये पॉलिहाऊस शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीमध्ये डॉक्टर अजित नवले यांच्यासह राज्यभरातून सुमारे अडीचशेहून अधिक प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते. या बैठकीनंतर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चाच्या संदर्भामध्ये पोलीस प्रशासनाची परवानगी घेतली नाही, असा विषय समोर ठेवून आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत.

nagar-farmer-march