भूमिअभिलेख कर्मचाऱ्यास एक हजाराची लाच घेताना पकडले

2

सामना प्रतिनिधी, माजलगाव

जमिनीचे क्षेत्र निश्चित करण्यासाठी एक हजार रुपयांची लाच घेताना बीड जिल्ह्यातील माजलगाव येथील भूमिअभिलेख कार्यालयातील भूमापक एस.जी.राठोड यांना एक हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले. ही कारवाई मंगळवारी दुपारी चार वाजता भूमिअभिलेख कार्यालयाच्या आवारात बीडच्या लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने केली.

विशेष म्हणजे सकाळी तक्रार येताच बीडच्या एसीबीने तत्काळ सापळा लावला. दुपारी चार वाजता तर राठोड हे लाच स्वीकारताना एसबीच्या जाळ्यात अडकले. त्यांच्याविरोधात माजलगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला जाणार आहे. ही कारवाई पोलीस उपअधीक्षक बाळकृष्ण हनपुडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गजानन जाधव, राकेश ठाकूर, मनोज गदळे, भारत गारदे, नदीम सय्यद आदींनी केली.