पैशांसाठी हपापलेला अधिकारी अटकेत

58

सामना ऑनलाईन। ठाणे

नोटबंदीमुळे भ्रष्टाचाराला आळा बसेल असा केंद्र सरकारचा दावा फोल ठरत असल्याचे उदाहरण ठाण्यात उघडकीस आले आहे. सहाय्यक शिक्षक पदावर रूजू करून घेण्यासाठी एक लाखांच्या गुलाबी नोटा लाच म्हणून स्वीकारता ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडलंय.

अनिल गांवकर असं या अधिकाऱ्याचे नाव असून त्याच्यासोबत एका शिक्षकालाही पोलिसांनी अटक केली आहे. विशेष म्हणजे या अधिकाऱ्याचे नवीन नोटा नसल्यास जुन्या पाचशे व हजाराच्या नोटाही घेतो असं सांगत काहीही करून लाच द्यायलाच असं सांगितलं.

जोगेश्वरी येथील सहाय्यक शिक्षण उपनिरीक्षक अनिल गांवकर यांच्या कार्यालयात सहाय्यक शिक्षक पदावर नेमणूक व्हावी यासाठी फिर्यादी यांनी अर्ज केला होता. मात्र त्यासाठी गांवकरने 11 लाख रुपये लाचेची मागणी केली. ही रक्कम देऊनही आरोपींचे समाधान झाले नाही. त्यांनी आणखीन तीन लाख रुपये देण्यासाठी तक्रारदारामागे तगादा लावला. तसेच नव्या दोन हजाराच्या नोटा नसल्यास जुन्या पाचशे व हजाराच्या नोटा त्यांना घेऊन येण्यास सांगितले. त्यातील १ लाख रुपयांचा पहिला हप्ता कोपरी आनंद टॉकीज येथे स्वीकारताना अनिल गांवकर आणि त्यांचे साथीदार माहीमच्या व्हिक्टोरिया हायस्कूलचे शिक्षक सुभाष आमने यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ अटक केली. आज या दोघांना कोर्टात उभे केले असता त्यांना शनिवारपर्यंत पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या