कुरखेडा नक्षलवादी हल्ला: त्या अधिकाऱ्याची अखेर बदली

1
kurkheda-blast1

सामना प्रतिनिधी । गडचिरोली

कुरखेडा येथील वादग्रस्त उपविभागीय पोलीस अधिकारी शैलेश काळे यांची अखेर बदली करण्यात आली. नंदुरबार जिल्ह्यात त्यांची बदली करण्यात आली असून, त्यांच्या जागी धानोराचे एसडीपीओ विक्रांत गायकवाड यांना प्रभार देण्यात आला.

नुकत्याच झालेल्या जांभूळखेडा इथे नक्षलवाद्यांनी घडवलेल्या सुरुंग स्फोटात 15 पोलीस जवान शहीद झाले होते. याप्रकरणी काळे यांच्या कार्यशैलीवर आणि निर्णयावर आक्षेप घेतला गेला होता. शहिदांच्या नातेवाईकांनीही काळे यांच्यावर टीका केली होती. या पार्श्वभूमीवर त्यांची चौकशी सुरू करण्यात आली असून, नंदुरबार इथे बदलीही करण्यात आली आहे.