नागपुरात वृद्ध दांपत्याची हत्या, नागरिकांमध्ये भीतीच वातावरण

प्रातिनिधिक फोटो

सामना ऑनलाईन । नागपूर

नागपुरात वयोवृद्ध दांपत्याची हत्या झाल्याने परिसरात भीतीच वातावरण निर्माण झालं आहे. शंकर चम्पाती आणि त्यांची पत्नी सीमा चम्पाती अशी हत्या झालेल्या दांपत्याची नावं आहेत. नागपूरच्या वाडी परिसरातील सुरक्षा नगरमध्ये ही दुहेरी हत्या झाली आहे. चोरीच्या उद्देशाने हत्या झाली असावी असा संशय पोलिसांनी व्यक्त आहे.

मृतक शंकर चम्पाती आणि त्यांची पत्नी सीमा चम्पाती आपल्या मुलीसह वाडी परिसरातील्या सुरक्षा नगरमध्ये राहत होते. सकाळी त्यांची मुलगी कामानिमित्त घराबाहेर गेली होती. मात्र जेव्हा ती घरी परतली तेव्हा आई आणि वडील रक्ताच्या थारोळ्यात निपचित पडले होते. दोघांच्याही डोक्यावर लोखंडी सळईने वार केले होते. पोलिसांनी दोघांचे मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठविले आहेत. या प्रकरणी वाडी पोलीस अधिक तपास करत आहेत.