संभाजीनगरात उसळलेल्या दंगलीत दोघांचा मृत्यू

2

सामना ऑनलाईन, संभाजीनगर

संभाजीनगर शहराच्या काही भागात किरकोळ कारणावरून सुरू झालेल्या दंगलीमध्ये मुसलमानांनी मोठ्या प्रमाणात जाळपोळ केल्याचे वृत्त आहे. शहागंज भागामध्ये मुसलमानांच्या एका गटाने एक घर देखील पेटवून दिले, या घरातील  ७० वर्षांची दिव्यांग व्यक्ती वेळीच बाहेर पडू न शकल्याने त्याचा मृत्यू झाला. तर दंगलखोरांना काबूमध्ये आणण्यासाठी केलेल्या गोळीबारात एका तरुणाचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.

जमावाने शहागंज भागात असलेल्या बाजारातील दुकानांना आग लावली, या जाळपोळीमध्ये कमीतकमी १५ दुकानं जळून खाक झाली आहेत. याशिवाय या मुसलमानांनी संस्थान गणेश मंदिराच्या शेजारी असलेल्या दुकानांनाही आगी लावल्या. इथली दुकानेही जळून खाक झाल्याने मोठं नुकसान झालं आहे.

sambhajianag-water-riot-5

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार मुसलमानांचा एक मोठा जमाव या घराबाहेर जमा झाला होता. या जमावाने पेट्रोलचे बोळे या घरावर फेकले, ज्यामुळे क्षणार्धात संपूर्ण घराने पेट घेतला. या जाळपोळीत भाजलेल्या दिव्यांग व्यक्तीला घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते, मात्र तिथे पोहोचल्यानंतर या व्यक्तीला मृत घोषित करण्यात आले.

जाळपोळीचं काल रात्रीपासून सुरू झालेलं सत्र आज सकाळी सहा वाजेच्या सुमारास देखील सुरू होते. काही वृत्तवाहिन्यांनी दाखवलेल्या दृश्यांमध्ये आज सकाळी आठच्या सुमारासही जाळपोळ सुरूच होती.

संभाजीनगरात मुस्लिमांची दंगल, हिंदूंचे दंगलखोरांना चोख उत्तर

दंगलीनंतर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहे. पोलिसांनी मुस्लिमबहुल वस्त्यांमध्ये कोम्बिंग ऑपरेशनला सुरूवात केल्याचे सांगण्यात येत आहे. शहरातील परिस्थिती नियंत्रणात असून अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन पोलीस प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

दंगलीची माहिती मिळताच शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे, महापौर नंदकुमार घोडेले, महानगरप्रमुख  प्रदीप जैस्वाल, जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, यांच्यासह शेकडो शिवसैनिकांनी दंगलग्रस्त भागात धाव घेतली आणि हिंदूना दिलासा देण्याचे काम सुरू केले आहे.