पुण्यात दोन मजली इमारत कोसळून ५ जण जखमी

सामना ऑनलाईन । पुणे

पुण्याच्या केशवनगर- मुंढवा परिसरात – कोसळली आहे. या दुर्घटनेत ५ जण जखमी झाले असून, ८ जणांना ढिगाऱ्याखालून आतापर्यंत बाहेर काढण्यात आलं आहे. ढिगाऱ्याखाली अजूनही काहीजण अडकल्याची भीती व्यक्त केली जाते आहे. जखमींवर रूग्णालयात उपचार सुरु असून घटनास्थळी पुणे महापालिका कर्मचारी आणि अग्निशमन दलाकडून बचावकार्य सुरू आहे. या इमारतीच्या तळ मजल्याला गोठा असून त्यातील गुरे देखील ढिगाऱ्याखाली अडकली आहेत.  सदर इमारत ही ३० वर्ष जूनी असून पुणे महापालिकेने रहिवाशांना नोटीसही बजावली होती.


सविस्तर वृत्त थोड्याच वेळात