…आणि विमानात महिला चक्क अंतर्वस्त्र सुकवू लागली

सामना ऑनलाईन। मॉस्को

विमानात घडणाऱ्या अनेक घटनांचे व्हिडिओ सोशल साईटवर व्हायरल होत असतात. यातील बरेच व्हिडिओ मजेशीर असतात तर काही व्हिडिओ धक्कादायकही असतात. पण सध्या सोशल साईटवर एका व्हिडिओने खळबळ उडवून दिली आहे. या व्हिडिओमध्ये ऱशियातील उरल एअरलाईन्सच्या विमानात एक महिला सर्व प्रवाशांसमोर ब्लोवर जवळ आपले अंतर्वस्त्र सुकवत असल्याचे दिसत आहे. तिच्या या कृत्यामुळे सहप्रवाशांनाही अवघडल्यासारखे वाटले. विशेषत: महिला प्रवाशांची अवस्था तर फारच विचित्र झाली होती. पण ही महिला हट्टाला पेटल्यानं त्यांना गप्प राहण्याशिवाय काही गत्यंतरच नव्हते.

तुर्कीमधील अंटाल्याहून हे विमान रशियाची राजधानी मॉस्कोकडे निघाले होते. विमानाने टेक ऑफ करताच या महिला प्रवाशाने आपले अंतर्वस्त्र काढलं व ते सुकवण्यास सुरुवात केली. या महिलेच्या मागच्या सीटवर बसलेल्या प्रवाशाने हा व्हिडीओ शूट केला असून तो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.