मालवणात स्वराध्या फाउंडेशन आयोजित राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचे उद्घाटन 

सामना ऑनलाईन । मालवण प्रतिनिधी 
व्यावसायिक नाटके आणि टीव्ही  मध्यम यांच्यात लोकांच्या मनोरंजनासाठी होत असलेल्या जीवघेण्या स्पर्धामुळे मराठी रंगभूमी भरडली जात आहे,अशी खंत व्यक्त करताना राजकीय पुढारी जेव्हा कलावंतांच्या पाठीशी ठाम उभे राहतील तेव्हाच रंगभूमी खऱ्या अर्थाने पुढे जाईल, असे मत अखिल भारतीय नाट्य परिषदेचे अध्यक्ष गंगाराम गवाणकर यांनी व्यक्त केले.
मालवण येथील स्वराध्या फाउंडेशनच्या वतीने आणि प्राईड लॅंण्ड प्रॉपर्टीज यांच्या वतीने येथील मामा वरेरकर नाट्यगृहात घेण्यात आलेल्या मामा वरेरकर करंडक २०१७ या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचे उद्घाटन शनिवारी गवाणकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उद्योजक शेखर मोर्वेकर,सत्यवान परब,युनियन बँकेचे शाखा व्यवस्थापक संदीप घुले, लेखक व सिने अभिनेता योगेश सोमण,नाट्य सिने अभिनेता रवींद्र देवधर, संस्थचे अध्यक्ष सुशांत पवार,मालवणी कवी रुजरिओ पिंटो,यांच्या सह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना गवाणकर म्हणाले, स्वराध्या संस्थेमार्फत वायरी भूतनाथ नूतन नाट्य समाज मंडळाचा सत्कार करण्यता आला. हि उल्लेखनीय बाब आहे. महारष्ट्रातील रसिकांना बोलीभाषेचे दर्शन घडविण्यासाठी विविध बोलीभाषाच्या एकांकिका स्पर्धा घेण्यात याव्यात अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
जेष्ठ नेपथ्यकार अनंत पंतवालावलकर  यांचा.गवाणकर यांच्या हस्ते शाल,श्रीफळ,व मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. संस्थेच्या वतीने गवाणकर यांचा मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. नाट्यगृहात साकारण्यात आलेल्या मच्छिंद्र कांबळी यांच्या स्मृती दालनाचे उद्घाटन गंगाराम गवाणकर यांच्या हस्ते करण्यत आले. फोटोग्राफार असोशिएशनच्या वतीने अजय मुणगेकर यांनी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमात रविद्र वराडकर,संदीप घुले, सुशांत पवार, यांनी आपले विचार मंडले.सूत्रसंचालन सुधीर कुर्ले, यांनी प्रास्ताविक गौरव ओरसकर,यांनी तर आभार सचिन टिकम यांनी मानले.