नगरमध्ये दोन अपघातात एक ठार, दोन गंभीर जखमी

2

सामना प्रतिनिधी । जामखेड 

जामखेड परीसरात झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात एक ठार तर दोन गंभीर जखमी झाले आहेत. या मध्ये एक अपघात सौताडा घाटात तर दुसरा अपघात नगररोडवरील पेट्रोल पंपाजवळ झाला आहे.

पहिला अपघात पहाटे सौताडा घाटात घडला. यामध्ये ब्रीजा गाडी ऊलटली. या अपघातात योगेश लक्ष्मण चव्हाण वय ३५ यांचा मृत्यू झाला. ते जामखेड कडुन बीड कडे जात असताना यांच्या गाडीचा अपघात झाला. त्यांच्या सोबत असलेले शिवाजी खंडू कुलाळ वय ३८ हे गंभीर जखमी झाले. या नंतर सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी व गाडीचे चालक महेश मोहोळकर व डॉक्टर गीते यांनी जखमींना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात  दाखल केले.

दुसरा अपघात दुपारी बारा वाजता जामखेड शहरातील कोठारी पेट्रोल पंपासमोर घडला. यावेळी मोटर सायकलला एक अज्ञात वाहनाने धडक दिल्याने रोहिदास माळी वय ६० हे गंभीर जखमी झाले. यांच्या तोंडाला जबर मार लागला तसेच त्यांचे साथीदार महादेव पांडुरंग माळी बीड-सांगवी हे किरकोळ जखमी झाले.