विजेच्या धक्क्याने कंत्राटी कर्मचाऱ्यांचा मृत्यू, दोघे जखमी

प्रातिनिधिक फोटो

सामना प्रतिनिधी । धाराशिव

येथील आकाशवाणी केंद्रातील एका २२ वर्षीय कंत्राटी कर्मचाऱ्याचा विजेचा धक्का लागून मृत्यू तर दोन अन्य कर्मचारी गंभीर जखमी झाल्याची घटना आज दुपारी घडली. यातील जखमी कर्मचाऱ्यांना उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

येथील आकाशवाणी केंद्रात शाम महादेव भोसले (वय-२२), विजय सोमनाथ सरपाळे (१९ दोघे रा. गावसूद ता.धाराशिव) व अनिल पवार (वय-३० रा. समुद्रवाणी ता.धाराशिव) हे तिघे कंत्राटी सफाई, गेटमन कंत्राटी कर्मचारी म्हणून काम करीत होते. हे तिघे बुधवार, १२ सप्टेंबर रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास शिडी ढकलत होते. त्यावेळी आकाशवाणी केंद्र परिसरातून गेलेल्या ११ केव्ही विद्युत वाहिनीचा शिडीला स्पर्श झाल्याने तिघांना जबर विद्युत धक्का बसला. यात शाम भोसले याचा जागीच मृत्यू झाला तर अनिल पवार, विजय सरपाळे हे दोघे जखमी झाले. जखमींना उपचारासाठी जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.