आता सचिन, लक्ष्मण टार्गेट, ‘एक व्यक्ती एक पद’ नियम आणणार गोत्यात

सामना ऑनलाईन, नवी दिल्ली

बीसीसीआयच्या ‘एक व्यक्ती एक पद’ या नियमाचा फटका सौरभ गांगुलीला बसला असतानाच आता भारतरत्न सचिन तेंडुलकर व शैलीदार फलंदाज व्हीव्हीएस लक्ष्मण हेही गोत्यात येण्याची शक्यता आहे. मध्य प्रदेश क्रिकेट असोसिएशनच्या एका सदस्याने सचिन तेंडुलकर व व्हीव्हीएस लक्ष्मणच्या विरोधात बीसीसीआय लोकपालकडे तक्रार केली आहे. ‘दोघेही बीसीसीआयच्या सल्लागार समितीत असून आयपीएलमधील संघांच्या प्रशिक्षण विभागात कार्यरतही आहेत’ अशा प्रकारचे वृत्त एका हिंदी वृत्तपत्राच्या वेबसाइटवर प्रसिद्ध करण्यात आले आहे.